चंद्रपूर :- राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून तालुका स्तरावर प्रथमच होणा-या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नियोजनाने येथे आलेले खेळाडू आणि प्रशिक्षक भारावून गेले आहेत. जिल्ह्यात आगमन होताच खेळाडूंच्या स्वागतापासून तर जेवण आणि निवासाच्या व्यवस्थेबद्दल त्यांनी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार आणि जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहे. विशेष म्हणजे येथे असलेला जेवणाचा दर्जा आणि व्यवस्था एकदम उत्तम असल्याच्या भावना खेळाडू आणि प्रशिक्षकांनी व्यक्त केल्या आहेत.
27 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत बल्लारपूर (विसापूर) तालुका क्रीडा संकूल येथे 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून जवळपास 1600 खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक आदी चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बाहेरून येणारे खेळाडू, प्रशिक्षक व सर्वांची निवास, भोजन, वाहतूक आदी व्यवस्था अतिशय दर्जेदार करण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनला दिल्या होत्या. याबाबत त्यांनी वारंवार पाठपुरावा व बैठका घेऊन अतिशय सुक्ष्म नियेाजन करून घेतले. त्याचीच फलश्रुती म्हणून येथे आलेल्या खेळाडूंनी व्यवस्थेबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
यावेळी हरयाणा येथून ॲथलेटिक्स शॉर्ट पुल स्पर्धेत सहभागी होणारी तमन्ना म्हणाली, येथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था अतिशय उत्तम करण्यात आली आहे. येथे येऊन खुप छान वाटत आहे. खेळाडूंसाठी प्रशासनाने सर्वच व्यवस्था दर्जेदार केल्या आहे. तर तमन्नाचे प्रशिक्षक म्हणाले, खेळाडूंना जेवण वेळेवर विशेष म्हणजे ग्राऊंडजवळ मिळत आहे, ही वाखाणण्याजोगी बाब आहे. अशी आहे भोजन व्यवस्था राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेदरम्यान विसापूर तालुका क्रीडा संकूल येथे रोज 2500 ते 3000 जणांसाठी सकाळचा नास्ता, दुपारचे जेवण, सांयकाळी चहा-कॉफी आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. सकाळी 7.30 ते 10.30 या वेळेत खेळाडू, प्रशिक्षकांना नास्ता दिला जातो. यात दिवसनिहाय मिसळ पाव, उपमा, पोहे, साबुदाणा खिचडी, वडासांबार, फळे, ब्रेड बटर, टी-कॉपी यांचा समावेश असतो. दुपारचे जेवण 12.30 ते 3.30 यावेळेत दिले जाते. याय दोन भाज्या (मिक्स व्हेज, वांगे, आलूमटर, सोयाबीन मटर व इतर भाज्यांपैकी कोणत्याही दोन) कडी, वरण, मसाला भात, पोळ्या, लोणचे, पापड, ग्रीन सलाद, चटणी आणि एक स्वीट यांचा समावेश असतो. तर रात्रीच्या जेवणात एक व्हेज भाजी व इतर पदार्थ दुपारच्या जेवणाप्रमाणेच असून रोज नॉन-व्हेज तयार करण्यात येते. तसेच कधी रबडी, व्हेजपुलाव, हलवा, आईसस्क्रीम आणि दूध देखील देण्यात येत आहे. भोजनाची संपूर्ण व्यवस्था बघण्यासाठी 250 ते 300 जणांची टीम कार्यरत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या