बल्लारशाह वनपरीक्षेत्राअंतर्गत अवैध रेतीची वाहतूक करतांना 2 ट्रॅक्टर सह ट्राली जप्त, वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल (2 tractors and trolley seized while transporting illegal sand under Ballarshah forest area, case registered under Forest Act)
बल्लारपूर :- दिनांक 27.12.2023 ला सकाळी 9.00 वाजताचे सुमारास मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर अंतर्गत बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र केम येथील कक्ष क्रमांक 495 मधील सरकारी जंगलातुन अवैधरित्या रेती उत्खणन करुन वाहतुक सुरु असल्याबाबत गुप्त माहितीचे आधारे बल्हारपुरातील एका ट्रॅक्टर व्यावसायिकाचे ट्रॅक्टर क्रमांक MH - 34 / AP-1043, MH-34 / L - 5883 व ट्राली क्रमांक MH - 33 2530, MH-34/L 5884 जप्त करुन आरोपी विरुध्द भारतीय वनअधिनियम 1927 चे कलम 26 (1) ड (ग), 52 दिनांक 27.12.2023 अन्वये प्राथमिक वनगुन्हा क्रमांक 13/8 दिनांक 27.12.2023 जारी करुन 2 ट्रॅक्टर व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. वनपरिक्षेत्र बल्हारशाह व फिरते पथक बल्हारशाह यांचे संयुक्त गस्ती दरम्यान सदरची कार्यवाही करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या दोन्ही ट्रॅक्टर व मुद्देमाल वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, बल्हारशाह येथे ठेवण्यात आलेले असुन सदर प्रकरणाचा पुढील तपास मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, श्रीमती. स्वेता बोड्डु, सहाय्यक वनसंरक्षक श्री. आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह श्री. नरेश रामचंद्र भोवरे व क्षेत्र सहाय्यक, बल्हारशाह श्री. कोमल घुगलोत हे करीत आहेत. सदर कार्यवाही यशस्वी करण्याकरीता फिरते पथक, बल्हारशाह चे कर्मचारी वनपाल श्री. चापले, श्री. सिरपुरकर, वनरक्षक श्री.शील व बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील वनरक्षक श्री. सुधीर बोकडे व उषा घोडवे यांनी सहकार्य केले. नरेश रा. भोवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह (प्रादे) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या