भारतीय संसदेच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई! सुप्रिया सुळे, मनीष तिवारी, अमोल कोल्हे यांच्या सह 141 विरोधी खासदारांचं निलंबन का? कारण काय? (The biggest action in the history of Indian Parliament! Why the suspension of 141 opposition MPs including Supriya Sule, Manish Tiwari, Amol Kolhe? What is the reason?)

Vidyanshnewslive
By -
0
भारतीय संसदेच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई! सुप्रिया सुळे, मनीष तिवारी, अमोल कोल्हे यांच्या सह 141 विरोधी खासदारांचं निलंबन का? कारण काय? (The biggest action in the history of Indian Parliament!  Why the suspension of 141 opposition MPs including Supriya Sule, Manish Tiwari, Amol Kolhe?  What is the reason?)
वृत्तसेवा :- विरोधी पक्षांच्या खासदारांनी केलेल्या गदारोळामुळे मंगळवारी 19 डिसेंबरला आणखी 49 खासदारांना निलंबित करण्यात आलं. आज संसदेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या 141 वर पोहोचली आहे. तसेच, लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. दरम्यान, भारतीय संसदेच्या इतिहासात खासदारांवर करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं संबोधलं जात आहे. काही दिवसांपूर्वी संसदेची सुरक्षा भेदत काही तरुणांनी लोकसभेसह संसद भवनाच्या आवारात गोंधळ घातला. याचप्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांनी सभागृहात उपस्थित राहून निवेदन द्यावं, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. तसेच, सर्व विरोधक आपल्या मागणीवर ठाम आहेत. संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निवेदनाची विरोधकांची ठाम मागणी संसदेची सुरक्षा भेदत काही दिवसांपूर्वी काही तरुणांनी घातलेल्या गोंधळबाबत विरोधकांकडून चर्चेची मागणी केली जात आहे. विरोधकांनी चर्चेची मागणी केल्यानंच एवढ्या मोठ्या प्रमाणावर खासदारांचं निलंबन करण्यात आल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. खासदारांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईबाबत बोलताना संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, ते सभागृहात फलक आणून देशातील जनतेचा अपमान करत आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील पराभवानंतर ते निराश झाले आहेत. त्यांचं वर्तन असंच सुरू राहिलं तर पुढील निवडणुकीनंतर ते परत येणार नाहीत. ते सभागृहात येणार नाहीत, असं ठरले होतं. लोकसभा अध्यक्षांसमोर हा निर्णय घेण्यात आला. सुप्रिया सुळे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव आणि दानिश अली यांच्यासह लोकसभेतील अनेक विरोधी खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आलं आहे. मनीष तिवारी, चंद्रशेखर प्रसाद, डिंपल यादव, कार्ती चिदंबरम, एसटी हसन, सुप्रिया सुळे, शथी थरूर, दानिश अली, माला रॉय, राजीव रंजन सिंह, संतोष कुमार, प्रतिभा सिंह, मोहम्मद सादिक, जगबीर सिंह गिल, महाबली सिंह, एमके विष्णू प्रसाद, फारुख अब्दुल्ला, गुरजीत सिंह औजला, फजलुर रहमान, रवनीत सिंह बिट्टू, दिनेश यादव, के सुधाकरन, सुशील कुमार रिंकू. ई चे निलम्बन झालं आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)