सीएसटीपी एस प्रशासन कुणाल कंपनीवर मेहरबान का ? :- राजु झोडे यांचा संतप्त सवाल, वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांचे सोमवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू, वीज केंद्र प्रशासन व कुणाल कंपणीविरोधात जोरदार घोषणाबाजी Why is CSTPS administration kind to Kunal company? :- Raju Zode's angry question, the food boycott movement of the contract workers of the power station started from Monday, loud slogans against the power station administration and Kunal company.

Vidyanshnewslive
By -
0

सीएसटीपीएस प्रशासन कुणाल कंपनीवर मेहरबान का ? :- राजु झोडे यांचा संतप्त सवाल, वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांचे सोमवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू, वीज केंद्र प्रशासन व कुणाल कंपणीविरोधात जोरदार  घोषणाबाजी Why is CSTPS administration kind to Kunal company?  :- Raju Zode's angry question, the food boycott movement of the contract workers of the power station started from Monday, loud slogans against the power station administration and Kunal company.

चंद्रपूर :- चंद्रपुर महाऔष्णिक वीज केंद्रातील खासगी कंपनी असलेल्या कुणाल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या विरोधात मागील सात दिवसांपासून कंत्राटी कामगारांचे साखळी उपोषण मेजर गेट समोर सुरू आहे.मात्र त्यांच्या साखळी उपोषणकडे वीज केंद्र प्रशासन व कुणाल कंपनीने दुर्लक्ष केल्यानं आज सोमवार पासून उपोषणावर बसलेल्या कामगारांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. यावेळी कंत्राटी कामगारांनी वीज केंद्र प्रशासन व कुणाल कंपनीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वीज केंद्रातील खासगी कंपनी असलेल्या कुणाल कंपनीत कंत्राटी पद्धतीने शेकडो कामगार काम करत आहेत. अशातच नियमानुसार या सर्व कामगारांचे पीएफ कपात करणे बंधनकारक असताना सुद्धा कुणाल कंपनीच्या व्यवस्थापनाने मागील सात वर्षांपासून कामगारांचे पीएफ कपात केले नाही. तर दुसरीकडे कामगारांचे वेतन सुद्धा 2 ते 3 महिने उशिरा देण्यात येत आहे. या सर्व गोष्टी कामगारांच्या लक्षात येताच त्यांनी राजू झोडे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार पासून साखळी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान पीएफचे कपात न केल्याने यात लाखोंची अफरातफर झाल्याची बाब सुद्धा उघडकीस आली. कुणाल कंपनीत अनेक वर्षांपासून कंत्राटी कामगार काम करत आहेत. मात्र त्यांचे वेतन नियमित होत नाही, त्यांचे भविष्य निर्वाह निधी कापल्या जात नाही, कुशल कामगारांना वेतन वाढ दिल्या जात नाही, इतकेच नव्हे तर कुणाल कंपनीच्या ठेकेदाराकडून कामगारांना कामावरून काढून टाकण्याची वारंवार धमकी सुद्धा दिल्या जाते. याविरोधात मेजर गेट समोर हे साखळी उपोषण सुरू आहे. मात्र त्यांच्या साखळी उपोषणकडे दुर्लक्ष केल्याने आज सोमवार पासून कामगारांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. यावेळी उपोषणकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत वीज केंद्र प्रशासन व कुणाल कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे, अन्नत्याग आंदोलक पंढरी टोंगे, आंनद पुणेकर, राहुल तुराणकर,अभय सपाट, आशीष ठेगणे, सोबत उलगुलान कामगार रवि पवार मंगेश बदकल कुणाल चौधरी सुमित भिमटे अक्षय राउत सुधीर डाहाकी अक्षय काकडे राहुल वाभले, राजु जागने प्रफुल्ल पाटिल आदि कामगार आंदोलक उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज ), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)