महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा, शिक्षक म्हणजे समाज परिवर्तनाचे एक माध्यम होय - प्राचार्य.डॉ.बादलशाह चव्हाण (Teacher's Day Celebration in Mahatma Jyotiba Phule College, Teacher is a medium of social change - Principal Dr. Badalshah Chavan)

Vidyanshnewslive
By -
0

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा, शिक्षक म्हणजे समाज परिवर्तनाचे एक माध्यम होय - प्राचार्य.डॉ.बादलशाह चव्हाण (Teacher's Day Celebration in Mahatma Jyotiba Phule College, Teacher is a medium of social change - Principal Dr. Badalshah Chavan)

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती प्रित्यर्थ दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो या निमित्ताने शिक्षक दिनी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.बादलशाह चव्हाण, प्रा.डॉ.किशोर चौरे, प्रा.सविता पवार मॅडम, यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलतांना प्रा.डॉ.बादलशाह चव्हाण म्हणालेत की शिक्षक ही समाज घडविण्याचे व समाज परिवर्तनाचे माध्यम असून विद्यार्थ्यांच्या जीवनात एक नवी दिशा दाखविण्याचे काम करतो. यासोबतच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या सारख्या समाज सुधारकांनी स्त्री शिक्षणाचे महत्वाचे कार्य केले. तद्नंतर बोलतांना प्रा.डॉ.किशोर चौरे सर म्हणालेत की, भविष्यात येणारा काळ कठीण असून यामध्ये आपल्याला टिकायचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखे वाचनकौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे. याप्रसंगी प्रा.सविता पवार मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकदिनी शिक्षकाची भूमिका पटवून देतांना विद्यार्थ्यांनी स्वयंशासनाची जबाबदारी स्वीकारली. याप्रसंगी प्रा. सविता पवार, प्रा.पल्लवी जुनघरे, प्रा. रोशन साखरकर, प्रा. दिवाकर मोहितकर, यांच्यासह वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी वर्गाची उपस्थिती होती.

           तर महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग(इंग्रजी माध्यम) द्वारे शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी विचार पिठावर प्रा.डॉ. बालमुकुंद कायरकर, प्रा.ले. योगेश टेकाडे, प्रा. कृष्णा लाभे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचं संचालन प्रा. सनी मेश्राम तर आभार प्रदर्शन प्रा. मसादे मॅडम यांनी केले. अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंशासन नुसार आपापल्या वर्गामध्ये अनेक विषय घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षकाची भूमिका कशी असते त्यानुसार वर्ग शिक्षिका बनल्या. त्यांच्या कला गुण प्रमाणे त्यांना पुरस्कार देण्यात आले. ११ अकरावी ची गायत्री पांबी हिने प्रथम आणि जेसिका मातंगी ने द्वितीय पुरस्कार प्राप्त केला तसेच बारावीची माही कौर आणि रिया मारपे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय पुरस्कार प्राप्त केला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)