नगर परिषद बल्लारपूरच्या वतीने " शिक्षकदिन " साजरा ( "Teacher's Day" celebrated at Gondaraje Natyagriha auditorium on behalf of Ballarpur Municipal Council)

Vidyanshnewslive
By -
0

नगर परिषद बल्लारपूरच्या वतीने " शिक्षकदिन " साजरा ( "Teacher's Day" celebrated at Gondaraje Natyagriha auditorium on behalf of Ballarpur Municipal Council)

बल्लारपूर :- ०५/०९/२०२३ रोजी, नगरपरिषद बल्लारपुरद्वारे "शिक्षकदिन" गोंडराजे बल्लाळशाह नाट्यगृहात बल्लारपुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री.विशाल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी श्री.जयवंत काटकर यांनी स्थान भूषविले. यावेळी मंचावर प्रमुख अथिति म्हणून नगरपरिषदेचे अंतर्गत लेखापरीक्षक श्री.दिपक पंडित उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक नगरपरिषदेचे शिक्षण विभाग प्रमुख श्री.श्रीनिवास रायला व सहआयोजक श्री.पांडुरंग पारखी व श्री.सुदाम राठोड मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची रूपरेखा नगरपरिषदेतील शिक्षण विभाग लिपिक श्रीमती रीना बिरबल बहोत यांनी तयार केली होती व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरपरिषदेचे वरिष्ठ लिपिक श्री.किशोर डाखोरे यांनी केले. कार्यक्रमात नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी, नगरपरिषदेच्या अधीनस्त असलेल्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच सर्वसामान्य नागरिकांची उपस्थिती होती.  कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारताचे दिवंगत राष्ट्रपति तथा शिक्षक डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून व प्रतिमेस हार चढवून  कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना रोपटे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात मंचावर उपस्थित मान्यवर तसेच उपस्थित शिक्षकवर्ग यांनी आपले मनोगत व्यक्त करून शिक्षक दिनानिमित्त आपले शैक्षणिक अनुभव व प्रेरक प्रसंग कथन केले. कार्यक्रमात नगरपरिषद शाळेतील सर्वात जेष्ठ शिक्षक श्री. पांडुरंग पारखी यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.जयवंत काटकर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच उपस्थित प्रत्येक मुख्याध्यापक व शिक्षक यांना मान्यवरांहस्ते भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रमाअखेरीस आभार प्रदर्शन श्री.घनश्याम पारधी यांनी केले. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)