जिल्ह्यात सोयाबीन पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव, कृषी अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्या, उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांची मागणी (The outbreak of various diseases on soybean crops in the district, the agriculture authorities should immediately issue Panchnama and provide compensation, Ulgulan Association President Raju Zode demanded.)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- जिल्ह्यात सोयाबीन पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असून संपूर्ण सोयाबीनच्या शेंगा तुटून पडत आहेत. तर पाने गळत असून पिवळसर पडले आहेत. त्यामुळं कृषी अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सोयाबीन पिक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना अचानकपणे सोयाबीन पिकावर विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव आल्यामुळे तीनच दिवसात संपूर्ण सोयाबीन पीके पिवळे पडून मोठया प्रमाणावर सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेले उत्पन्न हिरावल्या गेले आहे. खरीप हंगामातील पीक हातचे गेल्याने रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडले आहे. अचानक सोयाबिन पिकावर आलेल्या रोग प्रादुर्भावाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळं कृषी अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)