दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरू (New series of registration numbers for two-wheelers launched)

Vidyanshnewslive
By -
0

दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरू (New series of registration numbers for two-wheelers launched)

चंद्रपूर :- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांची  MH34-CG-0001 ते 9999 पर्यंतच्या नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका लवकरच सुरू करण्यात येत आहे. ज्या  वाहनधारकांना आपल्या वाहनाकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांकाची नोंदणी करण्यासाठी दि.15 सप्टेंबर 2023  रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत कार्यालयामध्ये अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. अर्जदाराने पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत, क्रमांकानुसार विहित केलेले शासकीय शुल्क, डीडी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपुर यांच्या नावे विहित शुल्क रकमेचा भरणा मालिका सुरू झाल्यानंतर करून आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक प्राप्त करून घ्यावे. तसेच अशा आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यानंतर वाहनाचे कागदपत्रे तात्काळ सादर करणे अनिवार्य राहील. मालिका सुरू असताना वाहन-4.0 प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर बंद करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. नवीन मालिका दि. 18 सप्टेंबर 2023  पासून सुरु करण्यात येईल. प्राप्त होणारे अर्ज दुपारी 4 वाजेपर्यंत कार्यालयांमध्ये स्वीकारले जातील. 15 सप्टेंबर रोजी अर्जाची छाननी करण्यात येईल. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज प्राप्त झाल्यास, अर्जदाराने कार्यालयामध्ये एकापेक्षा जास्त अर्ज आले किंवा कसे याबाबत चौकशी करावी. एकापेक्षा जास्त अर्ज आलेल्या क्रमांकाच्या बाबतीत 15 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत वाढीव शुल्काचे धनाकर्ष स्वतंत्र बंद लिफाफ्यातून सादर करणे बंधनकारक राहील. तसेच सायंकाळी 4.30 पर्यंत बंद लिफाफे उघडण्यात येतील व जास्त रकमेचे धनादेश सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल व उर्वरित धनादेश परत करण्यात येतील. असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)