ऐतिहासिक ! महिला आरक्षण विधेयक लोकसभेत दोन तृतीयांश बहुमताने मंजूर (Historical ! The Women's Reservation Bill was passed in the Lok Sabha with a two-thirds majority)

Vidyanshnewslive
By -
0

ऐतिहासिक ! महिला आरक्षण विधेयक लोकसभेत दोन तृतीयांश बहुमताने मंजूर (Historical ! The Women's Reservation Bill was passed in the Lok Sabha with a two-thirds majority)

नवी दिल्ली :- महिला आरक्षण विधेयकावर आज संसदेच्या विशेष अधिवेशनात चर्चा करण्यात येत आहे. या विधेयकावर बोलताना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी 'महिला या विधेयकाची मागील 13 वर्षापासून वाट पाहत आहेत' असं, स्पष्ट केलं. महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यावेळी खासदार हे मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित आहेत. आरक्षण विधेयकाला विरोधकांनीही पाठिंबा दर्शविलाय. राहुल गांधी म्हणाले, एक मोठा घटक आरक्षणापासून वंचित आहे. या प्रक्रियेच्यावेळी राष्ट्रपतींनी सभागृहात असणं गरजेच होतं. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा आहे. नव्या संसदेत बोलण्याची संधी मिळाली आहे. नव्या संसदेत बोलताना आनंद होत असल्याचे काँग्रसेचे खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं. महिला आरक्षण विधेयक हा देशासाठी महत्त्वाचा निर्णय आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षणाचं मोठा पाऊल होते. हे विधेयक आजपासून लागू व्हावे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. तुमचे शब्द कागद व भाषणापर्यंत मर्यादित न ठेवता कृतीने व्यक्त व्हा. नारी शक्ती वंदन विधेयकाला पाठिंबा द्या, असे आवाहन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत केले.

           महिला आरक्षण विधेयकावर आज संसदेच्या विशेष अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे. महिला आरक्षण विधेयकावर आज काँग्रेस नेत्या सोनिया गांधी ( Sonia Gandhi ) या बोलणार असल्याची माहिती काँग्रेसच्या वतीनं देण्यात आली आहे. विशेष म्हणजे महिला आरक्षण विधेयकावरुन आता श्रेय लाटण्याची चढाओढ लागली आहे. आरक्षणाच्या बाजूनं 454 मते पडली आहेत. त्यामुळे दोन तृतीयांश मतांनी महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. त्यामुळे महिला आरक्षण विधेयकाच कायद्यात रुपांतरण झालं आहे. 2 मते आरक्षणाच्या विरोधात पडली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकालात संसदेची नवीन इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत स्थलांतर केल्यानंतर पहिल्याच दिवशी नरेंद्र मोदी सरकारनं महिला आरक्षण विधेयक मांडलं आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. सरकारनं आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडल्याचा आरोप कपील सिब्बल यांनी मंगळवारी केला होता. तर काँग्रेसच्या इतर नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)