महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन विविध खेळांचे आयोजन करून उत्साहात साजरा... ! (Mahatma Jyotiba Phule College celebrates National Sports Day with enthusiasm by organizing various sports... !)

Vidyanshnewslive
By -
0

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन  विविध खेळांचे आयोजन करून उत्साहात साजरा... ! (Mahatma Jyotiba Phule College celebrates National Sports Day with enthusiasm by organizing various sports... !)


बल्लारपूर :- हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय  क्रीडा दिन देशभरात दरवर्षी साजरा केला जातो. विशेष म्हणजे 2012 पासून हाकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय खेल दिन म्हणून साजरा केला जातो. व या अनुषंगाने आज 29 ऑगस्ट 2023 रोजी मेजर ध्यानचंद यांच्या 118 व्या जन्मदिनाच्या निमित्ताने महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात विविध खेळांचं आयोजन करण्यात आले. मेजर ध्यानचंद ज्यांनी आपल्या अतुल्य खेळाने भारताचे नाव जगभर पोहोचविले शिवाय विविध ऑलम्पिक स्पर्धात सुवर्णपदक जिंकले. या  त्याच अनुषंगाने महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला. या अंतर्गत 30 यार्ड क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये प्राध्यापकांचे दोन संघ तसेच विद्यार्थ्यांचे सहा संघ असे एकूण 8 संघानी या ठिकाणी सहभागी झाले होते. या स्पर्धेत प्राध्यापकांच्या संघाने प्रथम पुरस्कार प्राप्त केला व  कनिष्ठ महाविद्यालयाच्या कॉमर्स विभागाचे संघाने द्वितीय पुरस्कार प्राप्त केला. अशा प्रकारे क्रीडा दिन महाविद्यालयात साजरा करण्यात आला. त्याशिवाय सकाळी सात ते आठ या वेळेत व्हॉलीबॉल चे प्रशिक्षण देण्यात आले. बल्लारपूर स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन तर्फे खेळाडूंना व्हॉलीबॉल शिकविण्यात आले, तसेच काही विद्यार्थ्यांना कराटेचे प्रशिक्षण देण्याकरिता संजय कुबडे सर या ठिकाणी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना गोळा फेक थाळीफेक याचही प्रशिक्षण देण्यात आलं अशाप्रकारे महाविद्यालयात क्रीडा दिन साजरा करण्यात आला यावेळी स्पर्धेच्या  उद्घाटनीय  सामन्यांमध्ये महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री संजय भाऊ कायरकर तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण सर, प्रा.डॉ. विनय कवाडे, प्रा.डॉ. किशोर चवरे, प्रा. डॉ. रोशन फुलकर, प्रा. डॉ. पंकज कावरे, प्रा.डॉ. बालमुकुंद कायरकर, प्रा. ले. योगेश टेकाडे, प्रा.सतिश कर्नासे, प्रा. दिवाकर मोहितकर, प्रा. ललित गेडाम, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. दिपक भगत, प्रा.राजेंद्रकुमार साखरे, प्रा.श्रद्धा कवाडे, प्रा.विभावरी नखाते, यांच्यासह कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक मंडळी व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)