कामगारांच्या शोषणाविरोधात वीज केंद्रातील कुणाल कंपनीविरोधात 5 सप्टेंबर पासून आंदोलन, पत्रकार परिषदेत राजू झोडे यांची माहिती (Protest against exploitation of workers against Kunal company in power station from September 5, information of Raju Zode in press conference)

Vidyanshnewslive
By -
0

कामगारांच्या शोषणाविरोधात वीज केंद्रातील कुणाल कंपनीविरोधात 5 सप्टेंबर पासून आंदोलन, पत्रकार परिषदेत राजू झोडे यांची माहिती (Protest against exploitation of workers against Kunal company in power station from September 5, information of Raju Zode in press conference)


चंद्रपूर :- चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील कुणाल कंपनी मागील अनेक वर्षांपासून कंत्राटी कामगारांचे शोषण करत आहे. या विरोधात कामगारांना सोबत घेऊन उलगुलान कामगार संघटनेच्या वतीने येत्या पाच सप्टेंबर पासून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. मागील कित्येक वर्षांपासून कुणाल कंपनीत कंत्राटी कामगार काम करत आहेत.मात्र त्यांचे वेतन नियमित होत नाही, त्यांचे भविष्य निर्वाह निधी कापल्या जात नाही,कुशल कामगारांना वेतन वाढ दिल्या जात नाही, इतकेच नव्हे तर कुणाल कंपनीच्या ठेकेदाराकडून कामगारांना कामावरून काढून टाकण्याची वारंवार धमकी सुद्धा दिल्या जाते. या सर्व बाबी कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी, वीज केंद्राचे मुख्य अभियंता यांना वारंवार निदर्शनास आणून दिल्या. मात्र कंपनीवर अजूनही कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. या सर्व प्रकारामुळे कामगारांच्या मानसिकतेचे खच्चीकरण होत असून   कामगारांचे वेतन वेळेत देण्यात यावे, भविष्य निर्वाह निधी कपात करण्यात यावा, कामगारांना वेतन वाढ देण्यात यावी यासह इतर मागण्यांना घेऊन येत्या 5 सप्टेंबर पासून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, रवि पवार, गुरु भगत, कुणाल चौधरी, सुमित भिमटे, मंगेश बदकल, अक्षय राउत, अभय सपाट, अमर गोलटकर, शाम चुके, मोनू मटाले, प्रतीक मानकर, प्रफुल्ल सोनट्टके, प्रवीण मंडावी, सुधीर डाहाकी, आंनद पुणेकर, राजु जगने, प्रफुल्ल पाटिल, राहुल वाभले आदि उलगुलान कामगार उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)