स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, तब्बल 1 वर्षांनंतरही सर्वोच्च न्यायालयाला सुनावणीसाठी मुहूर्त मिळेना... ! (Local Self-Government Elections postponed again, even after 1 year Supreme Court does not get time for hearing... !)

Vidyanshnewslive
By -
0

वृत्तसेवा :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणाबाबतची सर्वोच्च न्यायालयातील याचिकेची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली आहे. ही सुनावणी १ सप्टेंबरला होणार होती. मात्र, कामकाजाच्या वेळापत्रकात या याचिकेचा समावेश नसल्याने ही सुनावणी आता नंतर होणार आहे. यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणातील याचिकेवर मागील सुनावणी तब्बल एक वर्षापूर्वी म्हणजे ऑगस्ट २०२२ मध्ये झाली होती. विशेष म्हणजे मागील वर्षी पावसाळ्यात सुध्दा निवडणूक घेण्याचा आदेश देणारे सर्वोच्च न्यायालय तब्बल मागील वर्षात याच मुद्द्यावर तारीख वर तारीख देत आहे व यानंतर सातत्याने या सुनावणीला पुढची तारीख मिळत आहे. त्यामुळे महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)