राज्यातील पहिल्या अत्याधुनिक पशुचिकित्सालयाचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार ! विशेष म्हणजे आता गाई-म्हशींचाही एक्स-रे निघणार (Union Minister Nitin Gadkari will inaugurate the first state-of-the-art veterinary clinic in the state! Interestingly, now cows and buffaloes will also be X-rayed)

Vidyanshnewslive
By -
0

राज्यातील पहिल्या अत्याधुनिक पशुचिकित्सालयाचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार ! विशेष म्हणजे आता गाई-म्हशींचाही एक्स-रे निघणार (Union Minister Nitin Gadkari will inaugurate the first state-of-the-art veterinary clinic in the state!  Interestingly, now cows and buffaloes will also be X-rayed)

वृत्तसेवा :- 28 जुलै रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते राज्यातील पहिल्या अत्याधुनिक पशुवैद्यकीय रुग्णालयाचे उद्घाटन होणार आहे. प्राणी चाचणी, शल्य चिकित्सेची फाइवस्टार व्यवस्था या रुग्णालयात करण्यात आली आहे. पशुचिकित्सालयामध्ये गायी, म्हशींवर गंभीर स्वरुपाच्या आजारात शस्त्रक्रिया करणे, एक्स-रे काढणे अशा सर्व सुविधा अत्याधुनिक मशिनरीच्या साह्याने केल्या जाणार आहेत. गोकुलम गौरक्षण संस्थेची स्थापना अमरावती शहरातील बालरोग तज्ञ डॉ. हेमंत मुरके यांच्या पुढाकाराने 2013 मध्ये नांदुरा बुद्रुक या गावात करण्यात आली होती. या ठिकाणी आजारी गायींवर उपचार करण्यासाठी पशु चिकित्सालय सुरू करण्यात आले होते. यासह अमरावती जिल्ह्यात कुठेही एखादी गाय आजारी पडली, तर तिला या गौरक्षण संस्थेत आणून तिच्यावर उपचार केले जात होते. यासाठी खास ॲम्बुलन्सची व्यवस्था देखील करण्यात आली होती. शहर, जिल्ह्यातील अनेक पशु पालकांसाठी गोकुलम गौरक्षण संस्था दिलासा देणारे केंद्र बनले होते. मात्र आता या ठिकाणी असणाऱ्या पशुचिकित्सालयाचे रूपांतर अत्याधुनिक अशा पशु चिकित्सालयामध्ये करण्यात आले आहे. या पशुचिकित्सालयामध्ये गायी, म्हशींवर गंभीर स्वरूपाच्या आजारात शस्त्रक्रिया करणे, एक्स-रे काढणे अशा सर्व सुविधा अत्याधुनिक मशिनरीच्या साह्याने केल्या जाणार आहे, अशी माहिती गोकुलम गौरक्षण संस्थेचे विश्वस्त विनय बोथरा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. वृद्ध, भाकड अपघातग्रस्त गोवंशांची तसेच इतर प्राण्यांची सेवा गोकुलम गौरक्षण संस्थेत प्रामुख्याने केली जाते. सध्या या ठिकाणी एकूण 278 आजारी गोवंशांचे पालन पोषण केले जात आहे. अमरावती परिसरातील प्राणी, पशुपक्षींवर निशुल्क औषधोपचार, चिकित्सा शस्त्रक्रिया करणारी राज्यातील एकमेव संस्था म्हणून गोकुलम गौरक्षण संस्था ओळखली जाते. 2015 ते 2023 या आठ वर्षात एकूण 31 हजार 586 पशुपक्षी, प्राण्यांवर या ठिकाणी उपचार करण्यात आले आहेत. या संस्थेत चार पशुवैद्य सेवा देत असून 10 पेक्षा अधिक सेवानिवृत्त पशुसंवर्धन अधिकारी निशुल्क सेवा देत आहेत, असे महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य डॉ. सुनील सूर्यवंशी यांनी 'प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले. सुमारे 400 एकर जागेत पसरलेल्या गोकुलम गौरक्षण संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या अत्याधुनिक पशुचिकित्सालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 28 जुलैला होणार आहे. कबूतर खाण्याच्या परिसरात अतिशय सुंदर उद्यान साकारण्यात आले असून या ठिकाणी विविध महापुरुषांचे पुतळे, विविध रंगांची फुलझाडे या परिसराला पर्यटन स्थळाचे स्वरूप प्राप्त करून देतात. अनेक शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी या ठिकाणी सहलीसाठी येतात. शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संस्थेच्या या नव्या उपक्रमांचा शुभारंभ होणार असून जय्यत तयारी सुरू असल्याचे डॉ. सुनील सूर्यवंशी म्हणाले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)