धक्कादायक ! चंद्रपुरातील नामवंत नेत्ररोग तज्ञ डॉक्टर उमेश अग्रवाल यांनी आत्महत्या केल्याची माहिती (Shocking! It is reported that famous Ophthalmologist Doctor Umesh Aggarwal committed suicide in Chandrapur)
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील नामवंत नेत्ररोग तज्ञ डॉ.उमेश अग्रवाल यांनी आपल्या क्लिनिक मध्येच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली आहे. चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावरील चर्च समोर डॉ. उमेश अग्रवाल यांच साई आय क्लिनिक आहे, या क्लिनिकमध्ये रात्री 8 ते 9 च्या दरम्यान रेस्टरूम मध्ये डॉ.अग्रवाल यांनी हेवी डोज चे इंजेक्शन घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली असून डॉक्टरने इंजेक्शन घेतल्याची बाब ज्यावेळी उघडकीस आली तोपर्यंत खूप उशीर झाला होता, डॉ. उमेश अग्रवाल यांच्या पत्नी सुद्धा डॉक्टर असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच इंडियन मेडिकल असोसिएशन चे पदाधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आत्महत्या का केली याबाबत कारण अद्याप अस्पष्ट आहे या घटनेचा पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत असून लवकरच या घटनेमधील सत्यता उघडकीस येईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या