दिवंगत अभिमन्यू फुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. रोशन फुलकर यांचेकडून अभ्यासिकेस पुस्तक व ग्रंथसंपदा भेट (On the occasion of the late Abhimanyu Phulkar's birthday, Dr. Roshan Phulkar gifted a book and library to the scholar)

Vidyanshnewslive
By -
0

दिवंगत अभिमन्यू फुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. रोशन फुलकर यांचेकडून अभ्यासिकेस पुस्तक व ग्रंथसंपदा भेट (On the occasion of the late Abhimanyu Phulkar's birthday, Dr. Roshan Phulkar gifted a book and library to the scholar)

चंद्रपूर :- अभ्यासिकेस पुस्तक व ग्रंथ भेट दिवंगत अभिमन्यू फुलकर यांचा 76 वा वाढदिवस दिनांक 1 जुलै 2023 ला सुपटीपन्नो बुद्ध विहार जुनोना रोड बाबूपेठ येथे साजरा करण्यात आला. सदर विहार परिसरात सुरु असलेल्या डॉ. आंबेडकर वाचनालय व अभ्यासिकेस स्पर्धा परीक्षेची पुस्तके व ग्रंथ या प्रसंगी भेट स्वरूपात फुलकर कुटुंबियांकडून देण्यात आली. सदर कार्यक्रम प्रसंगी प्रा. डॉ. रोशन फुलकर यांनी आपल्या वडिलांचा वसा पुढे नेत असल्याचे सांगितले, आपल्या वडीलाप्रमाणे गरजू लोकांना मदत करण्याचा नेहमी प्रयत्न करेल असे आपल्या मनोगतातून ते बोलत होते. चांगल्या पुस्तकाचे वाचन नि अखंडीत अभ्यास हा मानवाना उच्च विचार सरणी प्रदान करतो असे ते म्हणाले. या पूर्वीही सामाजिक बांधिलकी जोपासत फुलकर कुटुंब वृद्धाश्रमातील लोकांची आरोग्य तपासणी, भोजन दान, विहाराच्या बांधकामाकारिता आर्थिक मदत असे अनेक समाजपयोगी उपक्रम हे कुटुंब सतत राबवीत असतात असे मत प्रा. संघपाल सरकटे यांनी मांडले. सदर कार्यक्रमात डॉ. वृंदा फुलकर, सुपटीपन्नो बुद्ध मंडळातील पदाधिकारी, परिसरातील नागरिक, फुलकर कुटुंबातील सदस्य, नातेवाईक व मित्र परिवार उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)