रेल्वे जमिनीवरील अतिक्रमण संदर्भात बल्लारपुरात पार पडली कागदपत्रांची तपासणी, सर्व कागदपत्र नागपूर डीआरएम कडे पाठवून उच्च स्तरावर निर्णय होणार ! (In relation to encroachment on railway land, inspection of documents was conducted in Ballarpur, all documents will be sent to Nagpur DRM and a decision will be taken at a higher level!)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- बल्लारपूर रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमण करणाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी आज 14 जुलै रोजी सहायक विभागीय अभियंता, मध्य रेल्वे, बल्लारशाह यांच्या कार्यालयात करण्यात आली. ADEN श्री. सुबोध कुमार यांनी सर्व कागदपत्रे तपासून मध्य रेल्वे, नागपूरच्या DRM कार्यालयात पाठविण्यास सांगितले. यावेळी अजय दुबे, NRUCC सदस्य, रेल्वे मंत्रालय, नवी दिल्ली यांनी पालकमंत्री श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे प्रतिनिधी म्हणून रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले की, पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार वादग्रस्त जमिनीची संयुक्त मोजमाप रेल्वे व राज्य प्रशासनाने करावे व त्याचा अहवाल पालकमंत्र्यांना सादर करावा. त्यानंतर त्यांच्या निर्णयावर योग्य ती कार्यवाही केली जाईल. तोपर्यंत रेल्वे प्रशासनाने कोणतेही घर पाडण्याची कारवाई करू नये.  असो, पालकमंत्री श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी गेल्या आठवड्याच्या बैठकीत रेल्वे प्रशासनाला कोणत्याही घराला हात लावू नका, असा इशारा दिला होता. या संदर्भात उत्तम मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री श्री. सुधीर भाऊ यांच्या उच्च पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यावेळी मिथिलेश पांडे जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा संघटन सरचिटणीस, श्रीकांत उपाध्याय विदर्भ प्रदेश सरचिटणीस भाजपा कामगार मोर्चा, अशोक सोनकर जिल्हा सचिव भाजपा कामगार मोर्चा, व भाजपचे ज्येष्ठ नेते शेख लाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)