अजित पवार यांच्या राजकीय भूकंपाच्या जोर का झटक्यामुळं भाजप-सेनेतील मंत्री पदासाठी इच्छुकांना जोरदार धक्का ! (Due to the shock of Ajit Pawar's political earthquake, the aspirants for the ministerial post in BJP-Sena were shocked!)

Vidyanshnewslive
By -
0

अजित पवार यांच्या राजकीय भूकंपाच्या जोर का झटक्यामुळं भाजप-सेनेतील मंत्री पदासाठी इच्छुकांना जोरदार धक्का ! (Due to the shock of Ajit Pawar's political earthquake, the aspirants for the ministerial post in BJP-Sena were shocked!)

चंद्रपूर :- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज होईल उद्या होईल व कमीत कमी वर्षभरासाठी तरी आपली मंत्रिपदावर वर्णी लागेल या अपेक्षेत असलेल्या भाजप व शिंदे सेनेच्या विदर्भातील इच्छुकांना राजकीय भूकंपामुळे जोरदार धक्का बसला आहे. अजित पवार यांच्यासोबत आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा शपथविधी झाल्याने आता 'मेरा नंबर कब आएगा' असाच सवाल या इच्छुकांच्या मनात घोळत आहे. पक्षाच्या श्रेष्ठींनीच यासाठी पुढाकार घेतल्याने उघडपणे भाष्य करण्याचीदेखील सोय राहिली नसल्याने या इच्छुकांच्या मनातील अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे. यासंदर्भात भाजपच्या राज्यपातळीवरील एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर मत व्यक्त केले. हा नक्कीच आमच्यासाठी मोठा आश्चर्याचा धक्का आहे. पक्षातील मंत्रिपदासाठी इच्छुकांमध्ये निश्चितच अस्वस्थता आहे. मात्र पक्षश्रेष्ठींनी भविष्यातील अंकगणित लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुका महत्त्वाच्या आहेत व 'मिशन-४८'च्या दृष्टीने ही भूमिका घेण्यात आली आहे. मंत्रिपदासाठी भविष्यात संधी येतील, असे संबंधित पदाधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना सांगितले. विशेषतः यामुळे भाजपच्या गोटामधील नेत्यांसमोर त्यांच्या राजकीय संधीबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा परत विस्तार होणार का व त्या संधी मिळणार का, हा सवाल आता त्यांना सतावतो आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची या राजकीय भूकंपात मोठी भूमिका असल्याने भाजपचे आमदार या दोन्ही नेत्यांकडूनच अपेक्षा लावून बसले आहेत. लोकमतने मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांशी संपर्क केला असता बहुतांश जणांनी प्रतिक्रियेसाठी नकार दिला. दरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मात्र या राजकीय खेळीचे स्वागत करण्यात आल्याचे चित्र होते. शरद पवारांनी सिंदखेडराजा येथील अपघातानंतर 'देवेंद्रवासी' या शब्दाचा प्रयोग केल्याने राजकीय वातावरण तापले. मात्र खऱ्या अर्थाने फडणवीस यांनी 'गुगली' टाकून राष्ट्रवादीच्या नेत्यांचे राजकारणाचे मैदानच हलविले व 'देवेंद्रवासी' म्हणजे काय हे दाखवून दिल्याचा कार्यकर्त्यांचा सूर होता.


संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)