अबब ! असाही एक उद्योगपती ज्याने कठीण परिस्थितीत साथ देणाऱ्या गावकऱ्यांना प्रत्येकी वाटले चक्क 58 लाख रुपये (Abba ! There was also a businessman who gave 58 lakh rupees each to the villagers who supported him in a difficult situation)

Vidyanshnewslive
By -
0

अबब ! असाही एक उद्योगपती ज्याने कठीण परिस्थितीत साथ देणाऱ्या गावकऱ्यांना प्रत्येकी वाटले चक्क 58 लाख रुपये (Abba ! There was also a businessman who gave 58 lakh rupees each to the villagers who supported him in a difficult situation)

वृत्तसेवा :- 2014 वर्षी केंद्रात सत्तेत येण्यासाठी अच्छे दिन व प्रत्येकी 15 लाख रु देण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने मात्र निवडणुकी नंतर यु-टर्न घेत हा एक चुनावी जुमला असल्याचं सांगितलं मात्र दक्षिण कोरियात एका उद्योगपतीने हलाखीच्या परिस्थितीत मदत करणाऱ्या गावकऱ्यांना प्रत्येकी 58 लाख रु दिले असल्याचे वृत्त सूत्रांकडून मिळाले आहे इतकंच नव्हे तर त्या उद्योगपतीने गावांमधील विद्यार्थ्यांना इतिहासाची पुस्तके आणि शैक्षणिक साहित्याचेही वाटप केले. एका अब्जावधी उद्योगपतीने त्याच्या गावातील प्रत्येक कुटुंबाला लाखो रुपये दान केले. हा उद्योगपती पूर्वी हलाखीच्या परिस्थितीत असताना त्याला गावातील काही कुटुंबांनी मदत केली होती. हा अब्जावधी उद्योगपती आहे, बांधकाम व्यवसायातील बूयूंग ग्रुपचे संस्थापक ली जोंग क्यून की. ८२ वर्षीय जोंग दक्षिण कोरियाचे आहेत. नुकतेच त्यांनी सनचिओन शहरातील अनपयोंग-री या छोट्या गावातील लोकांना सुमारे ५८-५८ लाख रुपये दिले. त्यांनी गावांमधील विद्यार्थ्यांना इतिहासाची पुस्तके आणि शैक्षणिक साहित्याचेही वाटप केले. त्याची परतफेड करण्यासाठी या उद्योगपतीने गावकऱ्यांना रोख रक्कम वाटली आहे. त्यामुळे संपूर्ण गावच मालामाल झाले आहे. द कोरियन हेराल्ड' या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या गावात एकूण २८० कुटुंब राहतात. अब्जाधीश जोंग यांनी सर्व कुटुंबांना प्रत्येकी ५८ लाख रुपये दिले. इतकेच नव्हे तर त्यांनी त्यांच्या शालेय मित्रांनाही लाखो रुपयांच्या भेटी दिल्या. सगळे मिळून जोंग यांनी तब्बल १५०० कोटी रुपयांचे दान केले. दानाची रक्कम जोंग यांच्या वैयक्तिक निधीतून देण्यात आली. एकेकाळी जोंग यांना परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. तेव्हा गावातील काही लोकांनी त्यांना आधार दिला होता. त्यामुळे आता सक्षम झाल्यानंतर त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांनी या रोख रकमेचे वाटप केले आहे. सन १९४१ मध्ये जन्मलेल्या जोंग यांनी १९७० मध्ये बांधकाम व्यावसायिक म्हणून काम सुरू केले होते. आता त्यांची संपत्ती सुमारे दीड लाख कोटी इतकी आहे. दक्षिण कोरियातील सर्वाधिक श्रीमंतांमध्ये त्यांची गणना होते. ते दानधर्म करण्यासाठी प्रसिद्ध असले तरी करचोरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात त्यांना यापूर्वी अटकही झाली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)