महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या 3 छात्र सैनिकांची महाराष्ट्र सुरक्षा बलात निवड, महाविद्यालयाच्या वतीनं यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार ! (3 student soldiers of Mahatma Jyotiba Phule College selected for Maharashtra Security Force, successful students felicitated on behalf of the college!)

Vidyanshnewslive
By -
0

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या 3 छात्र सैनिकांची महाराष्ट्र सुरक्षा बलात निवड, महाविद्यालयाच्या वतीनं यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार ! (3 student soldiers of Mahatma Jyotiba Phule College selected for Maharashtra Security Force, successful students felicitated on behalf of the college!)


बल्लारपूर :- बल्लारपूर येथील महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या एन.सी.सी विभागाच्या 3 छात्र सैनिकांची महाराष्ट्र सुरक्षा बलात निवड झाली असून महाराष्ट्र शासना द्वारे नव्याने निर्मित महाराष्ट्र सुरक्षा बल यांचे कार्य हे वेग वेगळ्या विभागांना सुरक्षा देण्याचं कार्य करते व यांच विभागात महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या एन.सी.सी विभागाच्या 3 छात्र सैनिक श्री राहुल विधाते, मनिष मडामे व कु. ज्योती वानखेडे यांची महाराष्ट्र सुरक्षा बलात निवड झाली असून यानिमित्ताने या 3 ही छात्र सैनिकांचा सत्काराचा कार्यक्रम महाविद्यालयात आयोजित करण्यात आला. 


        या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री संजयभाऊ कायरकर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ. बादलशाह चव्हाण, प्र-प्राचार्य यांची विचारपीठावर उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक करीत शाबासकीची थाप देत या विद्यार्थ्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सत्कारमूर्ती असलेल्या विद्यार्थ्यांनी आम्हाला घडविण्यासाठी व मौलाच मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागाच्या प्राध्यापकाच सहकार्य लाभले शिवाय वेळोवेळी योग्य ती मदत लाभली यावेळी विभाग प्रमुख असलेले प्रा. योगेश टेकाडे, एन.सी.सी अधिकारी यांनी या छात्र सैनिकाच्या यशासाठी त्यांची जिद्द, चिकाटी, व अथक परिश्रमामुळे या स्थानावर पोहोचले त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत ईतर विद्यार्थी सुध्दा यश प्राप्त करतील असे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. योगेश टेकाडे यांनी केले. या कार्यक्रमात प्रा.डॉ.रजत मंडल, प्रा.डॉ.विनय कवाडे, प्रा.डॉ.सुनिल कायरकर, प्रा.डॉ.किशोर चौरे, प्रा.डॉ.पंकज कावरे, प्रा.डॉ.रोशन फुलकर, प्रा.डॉ. पल्लवी जुनघरे, प्रा. सतिश कर्नासे, प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. ललित गेडाम, प्रा. दिवाकर मोहितकर, प्रा. रोशन साखरकर, प्रा. शुभांगी भेंडे(शर्मा), प्रा. सविता पवार,  प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. दिपक भगत, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. श्रध्दा कवाडे, प्रा.  विभावरी नखाते, तर शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून श्री प्रकाश मेश्राम, अशोक गर्गेलवार, सिध्दांत मोरे, श्यामभाऊ दरेकर, विशालभाऊ व अश्विनी सह महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी ई नी सदिच्छा दिल्या.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)