चंद्रपूर जिल्ह्यात मतदार यादीचा संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर, 21 जुलै ते 31 ऑगस्ट पर्यंत बीएलओ भेट देणार (Brief Revision Program of Electoral Roll Announced in Chandrapur District, BLO to Visit from July 21 to August 31)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर जिल्ह्यात मतदार यादीचा संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर, 21 जुलै ते 31 ऑगस्ट पर्यंत बीएलओ भेट देणार (Brief Revision Program of Electoral Roll Announced in Chandrapur District, BLO to Visit from July 21 to August 31)

चंद्रपूर :- जिल्ह्यात मतदारयादीच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. यासाठी केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) संपूर्ण जिल्ह्यात २१ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी भेटी देवून मतदार यादीतील दुरुस्त्या आणि आधार लिंक करणार असून नवमतदारांची नोंदणी देखील बीएलओ ॲपद्वारे केली जाणार आहे. या कालावाधीत मतदारांना आपल्या नावाची यादीत नाव असल्याची तपासणी करता येणार आहे. कुंटूंबातील मृत व्यक्तींची नावे नमुना ७ भरुन वगळणी करुन घ्यावी, १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची नमुना ६ भरुन मतदार यादीत नाव नोंदणी करुन घ्यावी. मतदार यादीत नाव पत्ता किंवा इतर तपशिलाची तपासणी करुन नमुना ८ भरुन मतदान कार्ड मध्ये असलेल्या चुका दुरुस्त करुन घ्याव्या. मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड जोडणी करुन नमुना ६ ब भरुन घ्यावा. जे मतदार काही कारणामुळे मतदार यादीत भागातून स्थलांतर झाले असल्यास किंवा पत्ता बदलून गेले असल्यास त्यांनी नमुना ८ भरुन घ्यावा. पुनरिक्षण पूर्व उपक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या गृहभेटी, मतदार यादीचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण, विद्यमान यादीतील आणि मतदान ओळखपत्रातील त्रुट्या दुर करणे, यादीत मतदारांचे छायाचित्र नसल्यास प्राप्त करून घेणे, छायाचित्र अस्पष्ट असल्यास बदलून घेणे, दुबार किंवा स्थलांतरित आणि मयत मतदारांची नावे वगळणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. ज्या मतदारांना तसे करणे शक्य नसेल तर त्यांनी संबंधित सर्व प्रकारच्या अर्जासाठी voters.eci.gov.inया संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा Voter Helpline App Play Store वरुन डाऊनलोड करुन मतदार यादीत नाव समाविष्ठ करावे किंवा तसे शक्य न झाल्यास सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार निवडणूक विभाग या कार्यालयास भेट द्यावी.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)