महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याविषयीं जनजागृतीपर व्याख्यान मार्गदर्शक म्हणून प्रा. निवेदिता पातुरकर यांची उपस्थिती In Mahatma Jyotiba Phule College as a public awareness lecture guide on National Education Policy 2020 Presence of pro. Nivedita Paturkar

Vidyanshnewslive
By -
0

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याविषयीं जनजागृतीपर व्याख्यान मार्गदर्शक म्हणून प्रा. निवेदिता पातुरकर यांची उपस्थिती  In Mahatma Jyotiba Phule College as a public awareness lecture guide on National Education Policy 2020  Presence of pro. Nivedita Paturkar


बल्लारपूर :- " शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, याला जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राशिक्षणहणार नाही " हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं विधान असून शिक्षणाचं महत्व प्राचीन काळापासून आहे तसेच महाराष्ट्रात शिक्षणाच्या प्रसारासाठी अनेक समाज सुधारकांनी अनेक प्रयत्न केले. 1968 ला भारतात पहिलं शैक्षणिक धोरण लागू झालं तदनंतर 1986 ला दुसऱ्या शैक्षणिक धोरणात बऱ्याच प्रमाणात बदल करण्यात आला. आता मात्र देशभरात 2020 च्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमानुसार बदल होणार असून तसेच 24 जुलै ते 29 जुलै दरम्यान साजऱ्या झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जनजागृती सप्ताहच्या निमित्ताने  बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. निवेदिता पातुरकर, राजुरा, प्रा. डॉ. बादलशाह चव्हाण, प्राचार्य महात्मा फुले महाविद्यालय बल्लारपूर, प्रा. शुभांगी भेंडे(शर्मा)(समाजशास्त्र विभाग), प्रा.डॉ. बालमुकुंद कायरकर ई ची विचारपीठावर उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करतांना प्रा. निवेदिता पातुरकर म्हणाल्यात की, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचं एक नव दालन सुरु होणार असून अभ्यासक्रम हा विद्यार्थी केंद्रित असणार आहे. विशेष म्हणजे शिक्षणाबरोबर रोजगाराचे मार्ग सुध्दा विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल. विद्यार्थी हा आपल्या आवडी नुसार शिक्षणाचं क्षेत्र निवडू शकेल. नव्या शैक्षणिक धोरणानुसार पदवी अभ्यासक्रम 4 वर्ष तर पदव्युत्तर अभ्यासक्रम 1 वर्षाचा असणार आहे तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषषी अनेक महत्वपूर्ण माहितीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी आपल्या अध्यक्षीय स्थानावरून मार्गदर्शन करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. बादलशाह चव्हाण म्हणालेत की, गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत 2023-24 सत्रापासून पदव्युत्तर अभ्यासक्रमात तर 2024-25 सत्रापासून पदवी अभ्यासक्रमाची अमलबजावणी सुरु होत असून विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य असणार आहे. विद्यार्थी हा आपल्या आवडीचं शिक्षण घेऊन आपलं करियर घडवून आणू शकतो. विशेष म्हणजे शिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या शक्यता निर्माण होऊ शकतात. या कार्य्रक्रमाचं प्रास्ताविक प्रा. शुभांगी भेंडे(शर्मा) यांनी तर संचालन प्रा. मोहनीश माकोडे व आभार प्रदर्शन प्रा. डॉ.पल्लवी जुनघरे यांनी केले. या कार्यक्रमास प्रामुख्याने प्रा.डॉ.विनय कवाडे, प्रा.डॉ.किशोर चौरे, प्रा.डॉ. पंकज कावरे, प्रा.डॉ.पल्लवी जुनघरे, प्रा.डॉ.रोशन फुलकर, प्रा.डॉ. रजत मंडल, प्रा.योगेश टेकाडे, प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. सतिश कर्नासे, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. दिपक भगत, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. श्रद्धा कवाडे, प्रा. विभावरी नखाते, यांच्यासह विद्यार्थ्यांची व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)