चंद्रपुरात उलगुलान संघटना, भीम आर्मी व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांची सभा उधळली, राजू झोडे यांच्यासह जवळपास 100 कार्यकर्त्यांना अटक व सुटका (In Chandrapur Ulgulan Organization, Bhim Army and Vanchit Bahujan Aghadi activists disrupted Sambhaji Bhide's meeting, around 100 activists including Raju Zode were arrested and released.)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील अग्रसेन भवनात संभाजी भिडे यांची आज रविवारी सकाळी 10:00 वाजताच्या सुमारास बैठक होती. याची माहिती होताच उलगुलान संघटना, वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांची सभा उधळून लावली, याच वेळी पोलिसांनी जवळपास १०० जणांना ताब्यात घेतले व सुटका केली. यावेळी कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संभाजी भिडे हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असून नुकतेच महाराष्ट्र व संपूर्ण भारताची बदनामी केली. त्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी जवळपास १०० जणांना ताब्यात घेतले व सुटका केली आहे. यावेळी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, वंचित आघाडी चे जयदीप खोब्रागडे, सदानंद करमनकर, प्रदीप झामरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थिती होती. भिडेने ज्या तिरंगा ध्वज चा अपमान करण्यात आला तो तिरंगा ध्वज सभा स्थळच्या बाहेर देऊन वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर तर्फे संभाजी भिडे यांचा निषेध करण्यात आला. संभाजी भिडे हे देशद्रोही असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देशभरातून होत आहे. दरम्यान चंद्रपूर शहरातील अग्रसेन भवनात संभाजी भिडे यांची आज रविवारी बैठक होती. याची माहिती होताच उलगुलान संघटना, वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अग्रसेन भवन परिसरात जाऊन जोरदार घोषणाबाजी करत भिडे यांची सभा उधळून लावली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)