धक्कादायक ! रुग्णवाहिकेत डिजल भरण्यासाठी पैसे नसल्यामुळं पेट्रोल पंपावर अडकली गर्भवती महिला (Shocking! A pregnant woman got stuck at a petrol pump due to lack of money to fill diesel in the ambulance)

Vidyanshnewslive
By -
0

धक्कादायक ! रुग्णवाहिकेत डिजल भरण्यासाठी पैसे नसल्यामुळं  पेट्रोल पंपावर अडकली गर्भवती महिला (Shocking!  A pregnant woman got stuck at a petrol pump due to lack of money to fill diesel in the ambulance)

गोंडपिपरी :- महाराष्ट्र शासन एकीकडे आरोग्य व्यवस्थेवर कोट्यवधी रुपये खर्च करण्याचा बाता करते शिवाय जननी सुरक्षा योजना तसेच अन्य योजनांच्या माध्यमातून गर्भवती महिलांवर उपचार करण्याला प्राधान्य देते मात्र रुग्णवाहिकेत डिजल भरायला पैसे नसल्यामुळं एका गर्भर्वती महिलेला एका पेट्रोल पंपावर तास-दिड तास वाट पाहत राहण्याचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात घडल्याची धक्कादायक माहिती आहे या संदर्भात अधिक माहितीनुसार गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका गर्भवती महिलेला त्रास जाणवायला लागला प्रकृती गंभीर असल्यामुळं त्या महिलेला रेफर टू चंद्रपूर करण्यात आले सदर महिलेला घेऊन धाबा येथून रुग्णवाहिका निघाली मात्र वाटेत गोंडपिपरी येथे रुग्णवाहिकेत डिजल भरायचं असल्यानं पेट्रोल पंपवर नियमित व्यवहार सुरु असतो मात्र डिजलचे पैसे थकीत असल्यामुळं पंप चालकाने  रुग्णवाहिकेत डिजल भरण्यास नकार दिला या दरम्यान पैशाची जुळवाजुळव करण्यात एक तास लागला सुदैवानं या काळात सदर महिलेला काही गंभीर इजा झाली नाही मात्र काही गंभीर प्रकार घडला असता तर याला जबाबदार कोण? मात्र तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पैशाची व्यवस्था करून रुग्णवाहिकेत डिजल भरले व रुग्णवाहिका चंद्रपूर साठी रवाना झाली. महाराष्ट्र सरकार जननी सुरक्षायोजना, जननी शिशु सुरक्षा योजना अशा अनेक योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देत असताना रुग्णवाहिकेत डिजल अभावी एका गर्भवती महिलेचा जीव आरोग्य विभाग मूळ धोक्यात आला होता. या बाबतीत संबंधित अधिकाऱ्याला मते आर्थिक व्यवहारासंबंधीचे कनिष्ठ लिपिक पद रिक्त असल्यामुळं व पंचायत समिती स्तरावर बिल रखडले असल्याने सदर प्रकार घडला असल्याची माहिती दिली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)