बेरोजगार युवकांची थट्टा ! समाज माध्यमावर असलेली महसूल विभागाची तलाठी भरतीची जाहिरात बोगस असल्याची चर्चा (Mockery of unemployed youth! There is a discussion that the revenue department's Talathi recruitment advertisement on social media is bogus)

Vidyanshnewslive
By -
0

बेरोजगार युवकांची थट्टा ! समाज माध्यमावर असलेली महसूल विभागाची तलाठी भरतीची जाहिरात बोगस असल्याची चर्चा (Mockery of unemployed youth!  There is a discussion that the revenue department's Talathi recruitment advertisement on social media is bogus)

वृत्तसेवा :- सोशल मीडियावरील बोगस जाहिरातींमुळे 'मेगा भरती, महाभरती'च्या नावाखाली नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या युवकांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. तलाठी भरतीची बोगस जाहिरात व्हॉट्सॲपवर प्रचंड व्हायरल झाली असून, युवकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. २०१८ पासून मेगा भरती, महाभरतीच्या नावाखाली ७५ हजार जागांचे गाजर युवकांना दाखविले जात आहे. आज भरती होईल, उद्या भरती होईल या आशेखाली लाखो युवक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. सध्या खासगी वेबसाइटवर, व्हॉट्सॲपसारख्या माध्यमातून बोगस जाहिरातींचा भडिमार सुरू असून युवकांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात आहे. 

            दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने प्रारूप जाहिरातीचा नमुना प्रसिद्ध झाला असून, त्याद्वारे चार हजार ६२५ तलाठ्यांच्या जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. मेगा भरतीच्या नावाखाली मागील शासनाने प्रत्येक उमेदवाराकडून ३५० ते ६०० रुपये फी घेऊन कोणतीही भरती केली नाही. तसेच यावेळीही महा भरतीच्या नावाखाली ९०० ते १००० रुपये परीक्षा फी घेऊन युवकांची पिळवणूक केली जात आहे. mahabhumi.gov.in या साइटवर ही जाहिरात आल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. वास्तविक, अशा प्रकारची कोणतीही जाहिरात या साइटवर उपलब्ध नाही. यासंदर्भात अधिक चौकशी केली असता, अशा प्रकारची कोणतीही जाहिरात शासनाच्या वतीने प्रसिद्ध झाली नसल्याचे एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याने सांगितले.

संपादक -: दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)