चंद्रपूर जिल्ह्यात मोटर वाहन कायद्याची कडक अमलबजावणी होणार, दुचाकी वरील दोघांनाही हेल्मेट बंधनकारक असणार ! (In Chandrapur district, there will be strict enforcement of motor vehicle law, helmets will be mandatory for both on two-wheelers !)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या अपघातात मोटार सायकलस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येत असल्याने जिल्ह्यात दुचाकी मोटारसायकल चालक व त्यांचे मागे बसणाऱ्या चार वर्षावरील सर्व व्यक्तींना मोटार वाहन कायद्यानुसार हेल्मेट परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मोटारवाहन  कायद्यातील नियमांची जिल्ह्यात कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शासकीय आस्थापना व खाजगी संस्थेतील अधिकारी कर्मचारी व नागरिकांनी या बाबीची दखल घ्यावी. वाहनधारकाने नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांविरूद्ध मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंद करून त्यांच्याकडून एक हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल तसेच वाहन धारकाची अनुज्ञप्ती 3 महिन्यासाठी निलंबित करण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)