चंद्रपूर जिल्ह्यातील बांधकाम विभागाचा अभियंता ड्रग्ज प्रकरणात अडकला एनसीबीच्या जाळ्यात ! (The engineer of the construction department of Chandrapur district was caught in the drug case in NCB's net!)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर जिल्ह्यातील बांधकाम विभागाचा अभियंता ड्रग्ज प्रकरणात अडकला एनसीबीच्या जाळ्यात ! (The engineer of the construction department of Chandrapur district was caught in the drug case in NCB's net!)


चंद्रपूर :- पोंभुर्णा येथील बांधकाम विभागाच्या अभियंत्याला ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने अटक केल्याने एकच खळबळ माजली आहे. एनसीबीच्या पथकाने ड्रग्ज पार्सल घेताना अभियंत्याला रंगेहाथ अटक केली आहे. हेमंत बिचवे असे 29 वर्षीय अटक अभियंत्याचे नाव आहे. अभियंत्याला 2.24 ग्रॅम एलसीडी ड्रग्ज स्वीकारताना पकडले. अटक अभियंत्याला पोंभुर्णा न्यायालयासमोर हजर केले असता त्याला ट्रांसिट डिमांड देण्यात आली आहे. अधिक चौकशीसाठी आरोपीला एनसीबीने दिल्लीत नेले. अटक अभियंता पोंभुर्णा येथील पीडब्लूडीच्या उपविभागीय कार्यालयामध्ये सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत होता. यानंतर दिल्ली पोलिसांनी चंद्रपूर पोलिसांना संपर्क साधून सदर प्रकरणाची माहिती दिली. त्यानुसार चंद्रपूर एनसीबी पथकाने सापळा रचून ड्रग्जचे पार्सल घेताना अभियंत्याला अटक केली. हे ड्र्ग्ज पोस्टाद्वारे चंद्रपूरला पोहचवण्यात आले होते. पोलिसांनी बिचवे याला अटक करत त्याच्या घरीही छापेमारी केली. छाप्यात त्याच्या घरी 3 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि एलएसडी ड्रग्जचे 24 पोस्ट कार्डची तिकिटं आढळून आली. या एका पोस्टकार्ड तिकिटाची किंमत 3 हजार रुपये आहे. या प्रकरणात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. पोलीस सखोल तपास करत आहेत. नागालँडहून दिल्लीत एक पार्सल आले होते. दिल्ली पोलिसांना या पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याचा संशय आला. पोलिसांनी या पार्सलची पाहणी केली असता यात ड्रग्ज आढळून आले. यानंतर पोलिसांनी पार्सल घेणाऱ्या संबंधित व्यक्तींना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता या ड्रग्जचे धागेदोरे दिल्लीपासून चंद्रपूरपर्यंत निष्पन्न झाले. हे ड्रग्ज कुठे कुठे पाठवण्यात येणार होते याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)