बल्लारपुरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी (Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj Jayanti Celebration at Mahatma Jyotiba Phule College, Ballarpur

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपुरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी (Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj Jayanti Celebration at Mahatma Jyotiba Phule College, Ballarpur

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज यांची 149 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली महाविद्यालयाच्या इतिहास विभागाद्वारे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा. प्रा. डॉ. बादलशाह चव्हाण, प्राचार्य महात्मा फुले महाविद्यालय बल्लारपूर, प्रा.डॉ.किशोर चौरे, प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. शुभांगी भेंडे(शर्मा), प्रा. कल्याणी पटवर्धन, प्रा. पल्लवी जुनघरे, प्रा. सतीश कर्णासे, प्रा.डॉ.विनय कवाडे,  प्रा. दिपक भगत, प्रा. ललित गेडाम, प्रा. डॉ. रोशन फुलकर, प्रा. मोहितकर सर, प्रा.योगेश टेकाडे, प्रा. रजत मंडल, प्रा. पवार मॅडम  यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी ई ची उपस्थिती होती. 


      यावेळी रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. शाहू महाराजांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात येते. यावेळी मनोगत व्यक्त करतांना प्रा. बादलशाह चव्हाण म्हणालेत की, शाहू महाराज एक राजे असून सुद्धा त्यांना तत्कालीन व्यवस्थेशी संघर्ष करावा लागला. एक राजे असून आपल्याला ही अवस्था तर प्रजेचं काय स्थिती असेल म्हणून त्यांनी आपल्या संस्थानात अनेक सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी शिक्षणाच्या प्रसारासाठी जे विद्यार्थी शाळेत जात नसत त्यांच्या पालकांना दंड ही ठोकणारा इतकंच नव्हे तर गुणवंत विद्यार्थी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजे म्हणूनही छत्रपती शाहू महाराजांना ओळखले जाते. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)