बुध्द जयंतीच्या पर्वावर बहुजन महापुरुषावर स्पर्धा परीक्षेचं आयोजन, गौतमी महिला मंडळ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचा उपक्रम (On the occasion of Buddha Jayanti, organization of competitive examination on Bahujan Mahapurusha, activities of Gautami Mahila Mandal and Dr.Babasaheb Ambedkar Library.)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- ५ मे 2023 रोजी जयंती निमीत्य बहुजन महापुरुषांच्या जिवनपटावर आधारित मुलांची स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सदर परिक्षेमध्ये ५० हुन अधिक मुला-मुलींनी सहभाग घेतला कार्यक्रमाचे ध्वजारोहण रेखा प्रमोद टिपले व दूधे काकु यांच्या हस्ते करण्यात आले तसेच आयुष्यमती करुणाताई अशोक पाझारे यांनी व डॉ. बाबासाहेब आबेडकर  वाचनालयास नीट च्या पुस्तकाचा संच धम्मदान देण्यात आला तसेच मंदा अनिल वानखेडे यांचे कडून खीर दान देण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल व यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात येईल. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नंदा मुन , काजल वनकर होते तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौतम कळसकर होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बुध्दशील बहादे तर आभार प्रदर्शन शालिनी प्रशांत वनकर काकू यांनी केले सदर कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी सर्व गौतमी महिला मंडळाच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या पदाधिकारी सदस्यांनी परिश्रम घेतले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)