लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने 12 वर्षीय मुलीला चिरडले, मुलीचा घटनास्थळीच मृत्यू (A 12-year-old girl was crushed by a truck transporting iron ore, the girl died on the spot)

Vidyanshnewslive
By -
0

लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने 12 वर्षीय मुलीला चिरडले, मुलीचा घटनास्थळीच मृत्यू (A 12-year-old girl was crushed by a truck transporting iron ore, the girl died on the spot)

गोंडपिपरी :- लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या  एका ट्रकने मुरखळा येथे दोघांचा बळी घेतल्याची घटना नुकतीच ३० एप्रिलला घडली होती. या घटनेला काही दिवस नाही होत तोच आज १४ मे रोजी चामोर्शी तालुक्यात लोहखनिजाच्या वाहतूक करणाऱ्या ट्रकने १२ वर्षीय मुलीचा बळी घेतला. १५ दिवसांत तीन बळी गेल्याने सुरजागड प्रकल्पातील लोहखनिजाच्या बेदरकार वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोनाक्षी मसराम (वय १२,रा. नांदगाव ता. राजुरा जि.चंद्रपूर) असे मृत मुलीचे नाव आहे. १४ रोजी सदर तरुणी सोनाक्षी ही आपल्या मामासोबत दुचाकीवरून आष्टी येथून गोंडपिपरीकडे जात असताना   रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने खडी, मुरुम अंथरलेला आहे. त्यावरून दुचाकी घसरली. यावेळी दोघेही खाली पडले. याचदरम्यान पाठीमागून आलेल्या लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने सोनाक्षीला चिरडले. सदर अपघात दुपारी 3:00 ते 3:30 वाजताच्या दरम्यान घडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून अपघातानंतर चालक ट्रकसह पळून गेला. सुरजागड प्रकल्पातील लोहखनिज वाहतूक करणारे ट्रक बेदरकारपणे धावतात. त्यामुळे रस्ते तर खराब होतच आहेत, पण हे ट्रक सामान्यांचा बळी घेऊ लागले आहेत. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)