बल्लारपुरात प्रॉपर्टीच्या वादातून एकाची हत्या, संशयावरून एक उच्च शिक्षित तरुणी अटकेत (One killed in Ballarpur due to property dispute, highly educated young woman arrested on suspicion)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपुरात प्रॉपर्टीच्या वादातून एकाची हत्या, संशयावरून एक उच्च शिक्षित तरुणी अटकेत (One killed in Ballarpur due to property dispute, highly educated young woman arrested on suspicion)

बल्लारपूर :- येथील न्यू कॉलनी रोड महाराणा प्रताप वॉर्ड दुर्गा माता मंदीर जवळ स्व शामराव कोडूरवार यांचा मृत्यू नंतर घराचा प्रॉपर्टी करिता नेहमी वाद होत असे. स्व शामराव याना मुलगा नसल्यानें तीन मुली आहेत त्यात दुसऱ्या नंबर चा जावई मृतक विशाल दासरवार नेहमी सासू सोबत प्रॉपर्टी साठी वाद घालायचा, त्यात 21 एप्रिल रोजी रात्रौच्या दरम्यान मृतक विशाल दासरवार याने घरी वाद घातल्याची चर्चा असून याची खाटेवरचं गळा कापून हत्या करण्यात आली. सदर हत्या प्रकरणाची माहीती बल्लारपूर पोलिसांना देण्यात आली असून  हत्येनंतर बल्लारपूर पोलिसांना याबाबत माहिती मिळाली असता  त्यांनी तपासाला गती देत या प्रकरनातं MBA करणाऱ्या कुटुंबातील एका उच्च शिक्षित युवतीला ताब्यात घेतले असून सदर युवतीने विशाल ची हत्या केल्याचे कबूल केले आहे. आरोपी युवती ही मृतकाची नातेवाईक असून मृतक तिचा नात्याने सख्खा मावसा लागत होता. पोलिसांनी अजून दोघांना ताब्यात घेतले आहे मात्र तपास सुरू असल्याने आरोपींची नावे जाहीर करण्यात आली नाही. एकूण या प्रकरणात 3 व्यक्तींना ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)