वाघाच्या हल्ल्यात सुरक्षा रक्षक ठार, (MEL security guard killed in tiger attack)

Vidyanshnewslive
By -
0

वाघाच्या हल्ल्यात सुरक्षा रक्षक ठार, security guard killed in tiger attack)

चंद्रपूर :- चंद्रपूर-मुल मार्गावर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन अंतर्गत येणाऱ्या लोहाराच्या जंगलात पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात आणखी एका इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सूत्रांच्या माहीती नुसार पुरुषोत्तम बोपचे (४०) हा इसम ठार झाला असून ही घटना शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता उघडकीस आली. चंद्रपूर शहरातील इंदिरा नगर येथील रहिवासी असलेले पुरुषोत्तम स्थानिक एम ई एल पोलाद कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. सकाळी पुरुषोत्तम वन फुले वेचण्यासाठी लोहारा जंगलात गेला होता. दुपार झाली तरी घरी परत आला नाही म्हणून पत्नीने घरा शेजारी असलेल्या पतीच्या मित्रासोबत शोध घेतला. यावेळी जंगलात येऊन बघितले असता त्याचा मृतदेह मिळाला. सदर घटनेची माहिती मिळताच वन विभाग व पोलिस विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)