सी-वोटर संस्थेचा सर्वे, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पडले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर भारी, उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी 28% जनतेची पसंती (C-Voter Institute survey, former Chief Minister Uddhav Thackeray has fallen heavily on Chief Minister Eknath Shinde, Uddhav Thackeray is favored by 28% of the people for the post of Chief Minister.)

Vidyanshnewslive
By -
0

मुंबई :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुळ गावी सध्या सुट्टीवर आहेत. अशातच राज्यात सत्ताबदलाचे वारे वाहू लागले आहे. अशातच एका सर्व्हेतून मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का देणारी माहिती समोर आली आहे. नवीन मुख्यमंत्री म्हणून जनतेची पसंती उध्दव ठाकरेंनाच असल्याचं समोर एका सर्व्हेक्षणात समोर आलं आहे. अशातच सी- व्होटर संस्थेनं केलेल्या सर्व्हेक्षणात महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यापेक्षा उध्दव ठाकरेंना अधिक पसंती मिळाल्याचं समोर आलं आहे. सी-व्होटरनं हे सर्वेक्षण 24 एप्रिल ते बुधवार (26 एप्रिल) या कालावधीत करण्यात आले. गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांचं वारं वाहू लागलं आहे. एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. याचवेळी अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर झळकले आहेत. तर खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री पदासाठी जयंत पाटील यांचे नाव घेतले आहे. या संदर्भात सूत्रांच्या माहितीनुसार  सी व्होटरच्या सर्व्हेत देवेंद्र फडणवीस यांना 26 टक्के,अजित पवारांना 11 टक्के, उद्धव ठाकरेंना 28 टक्के जनतेने पसंती दिली आहे. तर 35 टक्के लोकांनी माहित नसल्याचं म्हटलं आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)