महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूरच्या इतिहास व रासेयो विभागातर्फे हिवताप जनजागृती रॅली (Malaria Awareness Rally organized by Department of History and Research of Mahatma Jyotiba Phule College, Ballarpur)

Vidyanshnewslive
By -
0

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूरच्या इतिहास व रासेयो विभागातर्फे हिवताप जनजागृती रॅली (Malaria Awareness Rally organized by Department of History and Research of Mahatma Jyotiba Phule College, Ballarpur)


बल्लारपूर - बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात डॉ. किशोर चौरे, इतिहास विभागप्रमुख व डॉ. रोशन फुलकर रासेयो विभागप्रमुख यांनी आपल्या विभागातर्फे जागतिक हिवताप दिनाच्या अनुषंगाने आज दि. 25/04/2023 रोजी महाविद्यालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथील श्री. जे. बी. मासरकर (आ. सा.) यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकवृंदाना किटकजन्य आजारांबद्दल व त्यांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत शास्त्रीय माहिती सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आली, यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बी. डी. चव्हाण व इतिहास विभागप्रमुख डॉ. किशोर चौरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, सोबतच विद्यार्थ्यांना घेऊन वॉर्डात हिवताप जनजागृती रॅली काढण्यात आली, विद्यार्थ्यांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद होता, माहिती देतांना ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथील एम. एन. मेश्राम (आ. से.), हत्तीरोग विभागातील कर्मचारी, कुष्ठरोग विभागातील कर्मचारी आणि महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद उपस्थित होते. पाहुण्यांचे आभार डॉ. रोशन फुलकर यांनी मानले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)