वरोरा-माजरी दरम्यान रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटल्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशी गाड्या प्रभावित, जवळपास 4 तास प्रवाशांना करावा लागला गैरसोयीचा सामना (Southbound passenger trains affected due to breakage of railway overhead wire between Varora-Majri, passengers had to face inconvenience for almost 4 hours)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- मागील 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या वादळ, वारा, व पावसामुळे वरोरा ते मांजरी जवळ रेल्वेची ओव्हरहेड तार तुटल्याने अनेक तास प्रवासी रेल्वेगाड्या खोळंबल्या यामुळे प्रवाश्यांची चांगलीच दमछाक व गैरसोय झाली. वादळामुळे वरोरा पासून 3 किलोमीटर अंतरावर रेल्वे खांब क्र. 832 बी जवळ ओव्हरहेड तार तुटल्याने या मार्गावरील अप-डाऊन करणाऱ्या रेल्वेगाड्यापैकी  दानापूर सिकंदराबाद गाडी क्र.12792 ही 3:15 ला थांबली यामुळे अहमदाबाद ते महाबलीपुरम नवजीवन एक्सप्रेस क्र. 12655 ही गाडी थांबली त्यानंतर इतर दोन रेल्वेगाड्या मध्यावर थांबवावा लागल्या. जवळपास 3 तास रेल्वे गाड्या मध्यंतरी थांबल्यामुळे यादरम्यान प्रवाश्यांना उष्णता व उकड्यामुळे चांगलेच हाल सहन करावे लागले. रेल्वे विभागाच्या स्पेशल इंजिन च्या साहाय्याने गाड्यांची वाहतूक सुरळीत करण्यात आली. गाड्यांची वाहतूक सुरू झाल्याने प्रवाश्यांनी सुटकेचा श्वास घेतला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)