जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुस्तकांसाठी घर बांधणाऱ्या पुस्तकप्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काही खास गोष्टी जाणून घ्या.......! (A book lover who built a house for books on the occasion of World Book Day. Know some special things about Dr. Babasaheb Ambedkar.......!)

Vidyanshnewslive
By -
0

जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुस्तकांसाठी घर बांधणाऱ्या पुस्तकप्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काही खास गोष्टी जाणून घ्या.......! (A book lover who built a house for books on the occasion of World Book Day.  Know some special things about Dr. Babasaheb Ambedkar.......!)

वृत्तसेवा :- जागतिक पुस्तक दिन हा दरवर्षी २३ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. विल्यम शेक्सपियर, मिगुएल सर्व्हंटिस आणि इंका गार्सिलोसो यांच्यासह जगातील ख्यातनाम व्यक्तींचा या दिवशी मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, युनेस्कोने २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केले. खरं तर पुस्तकप्रेमींमध्ये भारतीय इतिहासात प्रथमच कित्येक दशकांपूर्वी खास पुस्तकांसाठीच घर बांधणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना असलेले पुस्तकांवरील प्रेम हे जगजाहीर आहे. चला तर त्यांच्याबद्दल विशेष माहिती जाणून घेऊ...! बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी बंगला बांधला होता ज्यात विविध भाषेंतील जवळपास ५० हजारांहून अधिक ग्रंथसंपदा ठासून भरलेली आहेत. बाबासाहेब परदेशात शिकायला होते तेव्हा त्यांच्याकडे पुस्तके खरेदीसाठी पैसे नसत. तेव्हा ते ग्रंथालयात जाऊन ग्रंथालय जितका वेळ उघडं असेल तितका वेळ ते तिथे पुस्तके वाचत बसत. लंडन ते मुंबई अशा सलग ६४ तासाच्या बोट प्रवासात बाबासाहेबांनी ८ हजार पाने वाचून काढली होती.  देवी दयाल लिखित 'डेली रुटीन ऑफ डॉ. आंबेडकर' या पुस्तकात याचा उल्लेख आहे. बाबासाहेब एकदा म्हणाले होते, "तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक. कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसे जगायचं ते शिकवेल. आपल्या अभ्यासात बाबासाहेबांना व्यत्यय अजिबात आवडत नसे. जगातील अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी बाबासाहेबांनी १४ दिवस खोलीला बाहेरून कुलूप लावून स्वतः ला कोंडून घेतले होते. एकदा परदेशातून त्यांनी एका बोटीतून अनेक पुस्तके पाठवली होती. पण ती बोट दुर्दैवाने बुडाली. जेव्हा बाबासाहेबांना ही गोष्ट समजली तेव्हा ते पुस्तकांच्या विरहात दोन दिवस रडत होते. बाबासाहेब तुमची सगळी पुस्तके विकत द्या.. 'तुम्ही माझा 'प्राण'च मागत आहात.' एकदा पंडित मोहन मालवीय यांनी बाबासाहेबांचा ग्रंथसंग्रह बनारस हिंदू विद्यापीठासाठी मागितला होता. यासाठी बाबासाहेबांना दोन लक्ष रुपये द्यायला ते तयार होते. पिलानी विद्यापीठासाठी घनश्यामदास बिर्ला यांनीही बाबासाहेबांचा ग्रंथसंग्रह मागितला होता. यासाठी ते बाबासाहेबांना सहा लक्ष रुपये द्यायला तयार होते. परंतु बाबासाहेबांनी त्यांचा हा प्रस्ताव धुडकावून लावला. कारण ‘आपली पुस्तके मागणे म्हणजे आपला प्राण मागण्यासारखे आहे.' असे बाबासाहेबांना वाटत होते. इतके त्यांचे पुस्तकांवर प्रेम होते. लोकांनी माझी अवहेलना केली पण या पुस्तकांनी मला ज्ञान दिलं. म्हणून मी पुस्तकांच्या बाबतीत इतका जागरूक आहे. पुस्तक हेच माझे मित्र आहेत असे बाबासाहेब नेहमी आवर्जून सांगत असत. पुस्तकांसाठी घर बांधताना त्यांनी त्या संबंधी पुरेपूर अभ्यास केला होता. त्यांना हवे असणारे ग्रंथ क्षणार्धात मिळाले पाहिजेत, अश्या पद्धतीने त्यांनी ग्रंथालयाची बांधणी केली. ग्रंथालयाची मांडणी त्यांनी न्यूयार्क मधील ग्रंथालायासारखीच केली तर मोठमोठ्या इमारती सारख्या खिडक्या, रोमन पद्धतीचे भव्य असे उत्तुंग खांब, भरपूर प्रकाश येईल अश्या विशिष्ट अंतराच्या खिडक्या, मोकळी जागा, भिंतींमध्ये बांधलेला सज्जाचा माळा, हि पुस्तकांसाठी बांधलेल्या राजगृहाची वैशिष्टे पाहताना रोम, नुयार्क, इंग्लंड, अमेरिका, या देशांमधील जगप्रसिद्ध वाचनालयातील उत्तर ग्रंथांचे प्रतिबिंब आतमध्ये उमटलेले दिसते. शहाजहानने मुमताजसाठी ताजमहल बांधले; राजेमहाराजांनी राजवाडे, राजमहाल, शिशमहाल, सोनेरी महाल तर कोणी सोन्याच्या विटांनी कलाकृती साकारल्या. पण जगातील एकमेव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी जागा कमी पडू नये यासाठी बंगला बांधावा असे ते एकमेव व्यक्ती होते. आजचा जागतिक पुस्तक दिनाचा उत्सव कोणामुळे कशामुळे साजरा होतो याहीपेक्षा एका अस्पृश्य जातीत जन्मलेल्या व शिक्षणापासून दूर ठेवलेल्या जातीत जन्म घेऊन त्या व्यक्तीने पुस्तकांवर इतके प्रेम केले की पुढे जाऊन त्यांनी वाचलेल्या पुस्तकांमधून एवढी बुद्धिमत्ता मिळवली व अनेक पुस्तकेही लिहिली. त्यातील एका पुस्तकावर तर आज अक्खा देश चालतोय. आजचा पुस्तक दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाच अर्पण करायला हवा हे आमचे स्पष्ट मत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)