वाढत्या उष्णतेचा कहर पाहता राज्यातील शाळांना आजपासूनच उन्हाळी सुट्ट्या, 15 जूनपासून महाराष्ट्रातील तर 30 जूनपासून विदर्भातील शाळा सुरु होणार ! (In view of the rising heat, the schools of the state will start summer vacation from today, from June 15 in Maharashtra and from June 30 in Vidarbha!)

Vidyanshnewslive
By -
0


वाढत्या उष्णतेचा कहर पाहता राज्यातील शाळांना आजपासूनच उन्हाळी सुट्ट्या, 15 जूनपासून महाराष्ट्रातील तर 30 जूनपासून विदर्भातील शाळा सुरु होणार ! (In view of the rising heat, the schools of the state will start summer vacation from today, from June 15 in Maharashtra and from June 30 in Vidarbha!)

चंद्रपूर :- राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना २१ एप्रिल म्हणजे आजपासूनच उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यंदा राज्यातील शाळांना २ मे पासून सुट्टी जाहीर झाली होती, ही सुट्टी १४ जूनपर्यंत असणार आहे. तर, विदर्भातील शाळा मात्र उन्हाळ्याची तीव्रता पाहता ३० जूनपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. शिक्षण विभागाने परिपत्रक जारी करत यासंदर्भात माहित दिली होती. मात्र, वाढत्या उन्हाचा कहर पाहता याच आठवड्यापासून शाळांना आता दिनांक २१ एप्रिलपासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अहवाल मागवले होते, त्यानंतर, त्यांनी दिनांक २१ एप्रिलपासून शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, शिक्षण विभागाचे नवीन परिपत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. राज्यात काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य मंडळाच्या सर्वच शाळांना आज दिनांक २१ एप्रिलपासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास किंवा शाळांचे महत्त्वाचे काम शैक्षणिक काम असल्यास तत्सम शाळा प्रशासनाने स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा, असे शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकात म्हटले आहे. 

          तसेच, विदर्भ वगळता राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरु होतील. विदर्भात ३० जूनपर्यंत शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सहसचिव इ.मु.काझी यांच्या सहीने नवीन परिपत्रक काढण्यात आलं आहे. त्यानुसार, शाळांन आजपासूनच सुट्टी जाहीर झाली आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)