बल्लारपुरातील महात्मा फुले महाविद्यालयात शिवस्वराज्यदिन साजरा !
बल्लारपूर ;- महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, बल्लारपूर येथे समाजशास्त्र विभाग आणि सांस्कृतिक विभागातर्फे दिनांक 6 जून 22 ला शिवस्वOराज्य दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. कल्याणी पटवर्धन यांनी अध्यक्षस्थान भूषविले. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे महान कार्य विद्यार्थ्यांच्या मनावर प्रतिबिंबित व्हावे म्हणून महाविद्यालय स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनी या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच पोवाड्याचा मार्फत शिवाजी महाराजांच्या महान कार्याची आठवण करून देण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. डॉ. सुनील कायरकर, प्रा. सतीश कर्णासे, प्रा. डॉ. रजत मंडल, समाजशास्त्र व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शुभांगी भेंडे शर्मा, श्री अशोक गर्गेलवार, श्री प्रकाश मेश्राम, प्रा. साखरकर, प्रा. गेडाम, प्रा. टेकाडे, श्री शामराव दरेकर, श्री साईनाथ पिपरे तसेच विद्यार्थी उपस्थित झाले होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताच्या गायनाने झाली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज लाईव्ह), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या