आयशर ने दिली दुचाकीला धडक, बल्लारपूर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत महिला पोलिसांचा घटनास्थळीच मृत्यू

Vidyanshnewslive
By -
0

आयशर ने दिली दुचाकीला धडक, बल्लारपूर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत महिला पोलिसांचा घटनास्थळीच मृत्यू 

बल्लारपूर :- बल्लारपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलिसाच्या दुचाकीला आयशर वाहनाने मागून धडक दिल्याने तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.3) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास राजुरा मुख्य महामार्गावर घडली. मोनल मेश्राम असे मृतक महिला पोलिसाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, महिला पोलिस मोनल मेश्राम ह्या बल्लापूर पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या. शुक्रवारी (दि.3) दिवसभर आपले कर्तव्य बजावून दुचाकीने (क्र.एम.एच. 34 टी 1877) बल्लारपूर येथुन राजुरा येथे येत होत्या. राजूरा मुख्य मार्गाने राजूराकडे जात असताना मागून येणाऱ्या एम.एच. 29 बि. ई. 4158 क्रमांकाच्या आयशर वाहनाने त्यांच्या गाडीला जबर धडक दिली. धडक जोराची असल्याने त्या दुचाकीवरून खाली कोसळल्या व डोक्याला जबर मार लागला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती विलास बनकर व दोन लहान मुले आहेत. त्यांच्या दुर्देवी निधनाने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)