बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलासाठी वाढीव २० कोटी रुपये निधी उपलब्ध होणार ! सुधारीत प्रशासकीय मान्यतेसाठी तातडीने कार्यवाही करा : आ.सुधीर मुनगंटीवार १ नोव्हेंबर पासून उड्डाण पुल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना

Vidyanshnewslive
By -
0

बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलासाठी वाढीव २० कोटी रुपये निधी उपलब्ध होणार !

सुधारीत प्रशासकीय मान्यतेसाठी तातडीने कार्यवाही करा : आ.सुधीर मुनगंटीवार

१ नोव्हेंबर पासून उड्डाण पुल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना


मुंबई : चंद्रपुर येथील बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी वाढलेला २० कोटी रुपये प्रकल्प निधी तातडीने मिळावा यासाठी सुधारीत प्रशासकीय मान्यता घेण्यात यावी व तसा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना  लोकलेखा समिती प्रमुख आ.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिल्या. तसेच दिनांक १ नोव्हेंबर पासून हा उड्डाण पुल वाहतुकीसाठी सुरु करण्याच्या दृष्टीने कामाला गती द्यावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. चंद्रपूर शहरातील बाबुपेठ उड्डाण पुलाच्या बांधकामास गती मिळण्याच्या दृष्टीने विधान भवनात आज लोकलेखा समिती प्रमुख आ.श्री.मुनगंटीवार यांनी आढावा बैठक घेतली. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाच्या उपसचिव श्रीमती हम्पैया, चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त श्री.मोहिते, सार्वजनिक  बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.भास्करवार या बैठकीला उपस्थित होते. दिनांक १८ फेब्रुवारी, २०१५ रोजी बाबुपेठ उड्डाण पुलासाठी ६१ कोटी ५६ लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या रेल्वे उड्डाण पुलाच्या नियोजीत प्रकल्प निधीमध्ये सुमारे २० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. यामध्ये राज्य शासनाकडून सुमारे १५ कोटी १२ लक्ष रुपयांचा वाढीव निधी येणे अपेक्षित आहे. सदर निधीसाठी आवश्यक प्रस्ताव तयार करण्यात येईल असे नगर विकास विभागाच्या उप सचिव श्रीमती हम्पैया यांनी बैठकीत सांगितले. चंद्रपूर शहरातील नागरिकांना वाहतुकीसाठी हा पुल १ नोव्हेंबर, २०२२ पासून खुला करण्यात यावा, अशा  सूचना आमदार श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना केल्या. सदर उड्डाणपुलाच्‍या बांधकामासाठी प्रशासकीय मान्‍यतेनुसार रेल्‍वेने वहन विभागाकडून १६.३१ कोटी रू. व चंद्रपूर महानगरपालिकेने ५ कोटी रू. तसेच राज्‍य शासनाकडून ४०.२६ कोटी रू. असे एकूण ६१.५७ कोटी रूपयांच्‍या बांधकामासाठी १५ फेब्रुवारी २०१६ रोजीच्‍या शासन निर्णयान्‍वये आ. मुनगंटीवार यांच्या अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात मंजूरी दिलेली आहे. नगरविकास विभागाच्‍या दिनांक ८ मार्च २०१९ रोजीच्‍या शासन निर्णयानुसार ६७ कोटी रूपयांपैकी २४ कोटी रू. निधी अखर्चित असल्‍याने अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ यांचेकडून दिनांक १७.१.२०२२ रोजी एकूण ८ कामांकरीता रू.१८ कोटी ७४ लक्ष रू. निधी मंजूरीकरिता तांत्रीक मान्‍यतेसह जिल्‍हाधिकारी चंद्रपूर यांच्‍या दिनांक १८ जानेवारी २०२२ च्‍या पत्रान्‍वये प्रस्‍ताव सादर केला. सदर रस्‍ते बांधकामासाठी दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ च्‍या शासन निर्णयान्‍वये १८.७४ कोटी रू. निधी मंजूर करण्‍यात आला. बाबुपेठ उड्डाणपुलाच्‍या बांधकामासाठी सन २०१८-१९ चा उर्वरित शिल्‍लक राहीलेला ५ कोटी २६ लक्ष रू. निधी जिल्‍हाधिकारी कार्यालयास जमा होता. यासंदर्भात आ. मुनगंटीवार यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले व हा निधी वितरीत करण्‍याबाबत विनंती केली. त्‍यानुसार दिनांक २६ मे २०२२ रोजीच्‍या शासन निर्णयान्‍वये सदर ५.२६ कोटी रू. निधी मंजूर व वितरीत करण्‍यात आला आहे. आता मंजूर होणाऱ्या 20 कोटी रु निधिच्या माध्यमातून सदर पुलाच्या बांधकामाला गती प्राप्त होणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)