अबब ! फोन-पे वरुन लाच स्वीकारली ; जालन्यातील 2 तलाठी लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले

Vidyanshnewslive
By -
0

अबब ! फोन-पे वरुन लाच स्वीकारली ; जालन्यातील 2 तलाठी लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले 

जालना : आजकाल पैशांसाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. चांगली नोकरी असून सुद्धा काहीजण पैशांसाठी आपला स्वाभिमान विकून टाकतात. अशीच एक घटना जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातून समोर आली आहे. मंठा तालुक्यात फोन-पे च्या माध्यमातून 30 हजारांची लाच घेताना दोन तलाठ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडलं आहे. अक्षय भुरेवाल आणि मंगेश लोखंडे अशी या तलाठ्यांची नावे आहेत. मंठा तालुक्यातील उमखेड येथील तलाठी अक्षय भुरेवाल आणि मंगरूळ येथील मंगेश लोखंडे यांनी वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला होता. यावेळी तक्रारदाराने वाळू वाहतूक करण्याची रितसर पावती (रॉयल्टी) तलाठ्यांना दाखवली होती. मात्र या पावतीवर खाडाखोड आहे, ही पावती चालत नाही असं सांगत 50 हजारांचा दंड भर नाहीतर, तुझ्यावर कारवाई करावी लागेल, असा दम या दोन्ही तलाठ्यांनी तक्रारदाराला दिला. इतकंच नाही तर तडजोड करायची असेल तर, 30 हजार रुपये दे अशी मागणी दोन्ही तलाठ्यांनी तक्रारदाराकडे केली. मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने दोन्ही तलाठ्यांनी तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली. दरम्यान, लाच घेण्याची तक्रार प्राप्त होताच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत मंगळवारी (31 मे) रोजी तलाठी अक्षय भुरेवाल आणि मंगेश लोखंडे यांना रंगेहाथ पकडले. दोन्ही तलाठ्यांनी फोन पे च्या माध्यमातून तक्रारदाराकडून लाच स्वीकारली होती. दरम्यान या प्रकरणी मंठा पोलिस ठाण्यात दोन्ही तलाठ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस करत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)