बल्लारपुरात आज ईद मिलन सोहळ्याच आयोजन

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपुरात आज ईद मिलन सोहळ्याच आयोजन 

बल्लारपूर :- बल्लारपुर शहराला मिनी इंडिया म्हणुन ओळखले जाते या शहरात विविध धर्मं,जाती व पंथाचे लोक गुण्यागोविंदाने वास्तव्य करतांना दिसून येतात. सद्यस्थितीत राज्यभरात मशिदीवरिल भोंगे व त्यासमोर वाजविण्यात येणारी हनुमान चालीसा त्यामूळे निर्माण होणारी कायदा व सुव्यवस्था सध्या तरी बल्लारपुर पासून दुर आहे या पार्श्वभूमीवर बल्लारपुर शहरात ईद निमित्ताने जमात-ए-इस्लामी हिंद, या संस्थेच्या वतीने आज 9 मे ला सायंकाळी 6:00 वाजता बल्लारपुर शहरातील गोंडराजे बल्लाळशाह, नाट्यगृह सभागृहात ईद मिलन सोहळ्याच आयोजन कऱण्यात येत आहे. विशेष म्हणजे जमात-ए-इस्लामी हिंद चे प्रचार व प्रसार विभागाचे सचिव प्रोफेसर वाजिद अली खान हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असुन प्रमुख अतिथी म्हणुन भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते मा. चंदनसिह चंदेल, शिवसेना चे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सदस्य,  घनश्याम मुलचंदानी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राकेश सोमाणी, बसपाचे प्रा. राजेश ब्राम्हणे, वंचित बहुजन आघाडीचे राजु  झोडे, बल्लारपुर शहर विकास आघाडीचे भारत थुलकर, विजय माटे, आम आदमी पार्टीचे किशोर पुसलवार, यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रात कार्य करणारे मान्यवर ई ची उपस्थिती असणार आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन जमात-ए-इस्लामी हिंद या संस्थे द्वारे कऱण्यात आले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)