चंद्रपूर, महाकाली मंदिर परिसरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला
चंद्रपूर :- आज संपूर्ण जग मातृ दिन साजरा करीत असतांना आज सकाळच्या सुमारास चंद्रपुरातील महाकाली मंदिर जवळील चहारे पेट्रोल पंप समोर रोडच्या बाजूला एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. सदर मृतक व्यक्तीचे वय अंदाजित 50 वर्ष असुन त्यांच्या उजव्या हातावर किसन महाराज देवस्थान, गोपाळराव वाघाडे घाटंजी असे गोंदवून आहे. सदर मृतदेह अनोळखी असुन नातेवाईकांचा शोध घेणे सुरू आहे ज्या कुणाला सदर व्यक्तीची ओळख पटल्यास चंद्रपुर शहर पोलिस स्टेशन ला संपर्क साधावा असे आवाहन कऱण्यात येत आहे सद्यस्थितीत चंद्रपुर शहरावर सूर्य आग ओकत असुन सदर व्यक्तीचा मृत्यू उष्मांघाताने तर झाला नसावा असाही अंदाज व्यक्त कऱण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास चंद्रपुर शहर पोलिस करीत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या