सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश, जिल्हा निहाय आढावा घेवून निवडणुकीचा कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश ज्या ठिकाणी फार पाऊस नसतो, त्या ठिकाणी निवडणूक घेण्यास काय हरकत - सर्वोच्च न्यायालय

Vidyanshnewslive
By -
0

सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश, जिल्हा निहाय आढावा घेवून निवडणुकीचा कार्यक्रम तयार  करण्याचे निर्देश 

ज्या ठिकाणी फार पाऊस नसतो, त्या ठिकाणी निवडणूक घेण्यास काय हरकत - सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली :- महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाने आज राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ज्या ठिकाणी फार पाऊस नसतो, त्या ठिकाणी निवडणुका घेण्यास काय हरकत आहे, असा प्रश्न करत जिल्हानिहाय आढावा घेऊन कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले. ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय 15 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश 4 मे रोजी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानंतर त्यामुळे निवडणुका पावसाळ्यात होणार का याबद्दलही कुतूहल निर्माण झालं होते. आयोगानं पावसाळ्यात निवडणुका घेण्यात काय काय प्रशासकीय अडचणी आहेत, हे सुप्रीम कोर्टात नमूद केले. निवडणूक आयोगाच्या भूमिकेनंतर आज सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाल महत्त्वाचे निर्देश दिले. ज्या ठिकाणी फार पाऊस नसतो त्या ठिकाणी निवडणुका घ्यायला काय हरकत आहे असा प्रश्न उपस्थित करत सुप्रीम कोर्टाने जिल्हानिहाय त्याचा आढावा घेऊन कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश दिले. निवडणूक आयोगावर हा निर्णय सोपवत असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. राज्यात 15 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 210 नगरपंचायती, 1900 ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रलंबित आहेत. इतक्या सगळ्या निवडणुका एकत्र घ्यायच्या झाल्यास त्या किमान 2 ते 3 टप्प्यांत घ्याव्या लागतील आणि 6 आठवडे चालतील. सुप्रीम कोर्ट निवडणुकीसाठी आग्रही का? कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ निवडणूक लांबवता येणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने मागील सुनावणीतच स्पष्ट केले होते. ट्रिपल टेस्ट पूर्ण होईपर्यंत ओबीसी आरक्षण देता येणार नाही. त्यामुळे पाच वर्षाची मुदत पूर्ण केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते. एकूणच सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशामुळं विदर्भ व मराठवाडा विभागात निवडणुका(जिथे पाऊस कमी असतो) होण्याची शक्यता आहे तर मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र पावसाळ्यानंतर निवडणूक होऊ शकते आता सर्व लक्ष राज्य निवडणूक आयोगाकडे लागलं आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज),  मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)