आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणा यांनी सज्ज राहावे - डॉ. दीप्ती सुर्यवंशी

Vidyanshnewslive
By -
0

आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणा यांनी सज्ज राहावे - डॉ. दीप्ती सुर्यवंशी 



बल्लारपूर :- आज दिनांक 25.5.22 ला  मान्सून पूर्व तयारी व आराखडा तयार करणे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत उपाययोजना करणे यासाठी मा. डॉ दीप्ती सुर्यवंशी उपविभागीय अधिकारी बल्लारपूर यांच्या अध्यक्षतेखाली बल्लारपूर तालुक्यातील  बल्लारपूर पेपर मिल उद्योग, बामणी प्रोटिन्स चे प्रमुख, वेकोलि, ई सर्व शासकीय विभागाचे अधिकारी यांची संयुक्त सभा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली. या सभेत पावसाळ्यापूर्वी सर्व विभागांनी आवश्यक त्या यावर तत्काळ अमलबजावणी करावी असे उपविभागीय अधिकारी यांनी निर्देश दिले. सार्वजनीक बांधकाम विभागाने रस्ताची डागडुजी, आरोग्य विभागाने पुरेसा औषध साठा व ईतर सामग्री, नगर परिषद ने नालेसफाई, ब्लिचिंग पाउडर, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी यांनी लोंबकळणाऱ्या तारा दुरुस्ती, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण यांनी स्वच्छ पाणीपुरवठा, पुरवठा विभागाने दरवर्षी पूर येणार्‍या गावांना दोन महिन्यांचे आगाऊ धान्य वाटप करण्याच्या सूचना संजय राईंचवार तहसीलदार बल्लारपूर यांनी दिल्या. सभेत देण्यात आल्या. या सभेस श्री रमीझ मुलानी प्रभारी ठाणेदार, श्री अनिरुद्ध वाळके विस्तार अधिकारी, श्री सतीश साळवे नायब तहसीलदार,  श्री संतोष थिपे वनपरिक्षेत्राधिकारी, विविध विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)