गिलबिली गाव ठरणार विकासाचं मॉडेल
बल्लारपूर :- बल्लारपूर तालुक्यातील गिलबिली ग्रामपंचायतीची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत दशवार्षिक सुक्ष्म नियोजन आराखड्याकरिता निवड झाली असुन या विकासाच्या माध्यमातून गिलबिली ग्रामपंचायत एक विकासाचे मॉडेल ठरणार आहे याकरिता नरेगा सहायक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहायक व रोजगार सेवकाची चमू, संयुक्त माध्यमातून विकास आराखडा तयार कऱण्यात येणार आहे. गिलबिली ग्रामपंचायतीतील आसेगाव, मोहाडी, गिलबिली गावातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण कऱण्यात आले आहे. कुटुंबाच्या मागणीनुसार योजनेतील पाहिजे त्या कामा पैकी वैयक्तिक कामाची मागणी नोंदविण्यात आली आहे. यानंतर तिन्ही गावाची शिवार फेरी, गाव फेरी काढण्यात येणार आहे सार्वजनिक जलसंधारण कामाचे नियोजन कऱण्यात येणार आहे वन जमीन व वैयक्तिक जमिनीवर वृक्ष लागवड, तलावातील गाड उपसणे, यासह गावातील समग्र विकास करण्यावर भर देण्यात येइल. सदर प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी मा. संजय राईंचवार तहसीलदार साहेब बल्लारपूर, मा. किरणकुमार धनावडे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती बल्लारपूर, यांनी पहिल्याच दिवशी सभा घेवून उपस्थित असलेल्या गावकऱ्याची सभा घेवून मार्गदर्शन केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या