शैक्षणिक फी न भरल्यामुळे खाजगी शाळा विद्यार्थ्यांना त्रास देण्याच्या तक्रारीत वाढ : अनेक विद्यार्थ्यांना फी अभावी वर्गाबाहेर ठेवल्याचा तक्रारी

Vidyanshnewslive
By -
0

शैक्षणिक फी न भरल्यामुळे खाजगी शाळा विद्यार्थ्यांना त्रास देण्याच्या तक्रारीत वाढ : अनेक विद्यार्थ्यांना फी अभावी वर्गाबाहेर ठेवल्याचा तक्रारी

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील खाजगी शाळा असलेल्या गुरुनानक पब्लिक स्कुलच्या शालेय व्यवस्थापनाने कोरोनाच्या संक्रमनांच्या काळातील शैक्षणिक फी न भरल्यामुळे विद्यार्थ्याना अनेक प्रकारे शैक्षणिक व मानसिक त्रास देत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे तसेच कोरोनाच्या संक्रमण काळातही शैक्षणिक फी अभावी कोणत्याही विद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचित ठेवता कामा नये असे निर्देश देण्यात आले असतांना आता मात्र कोरोना संक्रमण नियंत्रणात आल्यावर बल्लारपूर शहरातील खाजगी शाळा मात्र फी साठी विद्यार्थ्यांना सारखा तगादा लावत आहे विद्यार्थ्यानी फी न भरल्यास त्यांना परीक्षा पासून वंचीत तर ठेवल्या जातेच शिवाय अशा विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर उभे ठेवून त्यांच्यात हीन भावना निर्माण करून कोवळ्या वयात विद्यार्थ्याचं मानसिक खच्चीकरण करण्यात येत आहे. या संदर्भात विद्यार्थ्यानी पालकांना सांगितले असता पालकासह वंचितचे नेते राजू झोडे यांनी गुरुनानक पब्लिक स्कुल येथे विचारणा केली असता त्यांना असमाधानकारक उत्तर देण्यात आले तसेच फी वेळेवर भरावी असा धमकीवजा इशारा देण्यात आल्याची माहाती आहे. यानुसार पालक वर्गाने विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाविषयी मा.तहसीलदार यांच्यामार्फत शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी चंद्रपूर, पालकमंत्री चंद्रपूर ई ना निवेदनातुन होणाऱ्या अडचणी त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. 

           यासोबतच बल्लारपूर बामणी परिसरातील एका प्रतिष्ठित खाजगी कॉन्व्हेंट ने फी साठी विद्यार्थ्याचा छळ करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. विशेष बाब म्हणजे मागील २ वर्षात आर्थिक टंचाई अभावी  शाळेची फी भरली नसल्यामुळं फी भरण्याचा सारखा तगादा शालेय व्यवस्थापन करीत आहे तसेच फी न भरल्यामुल अनेक विद्यार्थ्याना वर्गाबाहेर ठेवण्यात आल्याची माहिती आहे. सदर प्रकार मागील २ ते ३ दिवसापासून होत असल्याची माहिती आहे. अनेक विद्यार्थी वर्गाबाहेर उभे राहत असल्याचे चित्र होते विद्यार्थी आपल्या पालकांना फोन करून सांगतात आहे. काही पालकांनी यासंदर्भात आक्षेप घेतला असून शाळेत विचारणा केली असता त्यांना विद्यार्थ्याची टी.सी देऊन हाकलण्याचे  फर्मान ही देण्यात आल्याचे माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे एकूणच जिल्ह्यातही काही खाजगी शाळांकडून फी अभावी कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होता कामा नये अशी मागनी पालकांनी केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)