चंद्रपुरात काँग्रेस पक्षाचे महागाई चालींसा आंदोलन, उद्या शुक्रवारला चंद्रपुरातील पेट्रोल पंपावर होईल आंदोलन
चंद्रपूर :- सद्यस्थिती देशभरात महागाईने उच्चांक गाठला असून दररोजच्या वाढत्या पेट्रोल,डिजलच्या किमतीमुळे सर्वसामान्य जनतेचे जीवन जगणे कठीण होत चालले आहे म्हणून झोपेचं सोंग घेतलेल्या केंद्र सरकारला जाग करण्यासाठी चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी तर्फे महागाई चालींसा आंदोलन करण्यात येत आहे. देशातील महागाई कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याऐवजी झोपेचे सोंग घेऊन असलेल्या केंद्र सरकारला जागे करण्यासाठी आता काँग्रेसच्या वतीने महागाई चालिसा आंदोलन करण्यात येणार आहे. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात शुक्रवारी २२ एप्रिलला आंदोलन होणार आहे. शहरातील कोतपल्लीवार पेट्रोल पंपसमोर दुपारी ४ वाजता, तर कस्तुरबा मार्गावरील स्टेट बँकेसमोरील पेट्रोल पंपावर सायंकाळी ५ वाजता आंदोलन केले जाणार आहे. देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल, डिझेलचे दर दिवसागणिक वाढत आहे. जीवनावश्यक वस्तूसोबतच खाद्यतेलाच्या किमतीही भरमसाठ वाढल्या आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. परंतु, केंद्र सरकारचे महागाई कमी करण्याकडे कोणतेही लक्ष नाही. देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशात वाढत्या महागाईमुळे जगणे कठीण झाले आहे. पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार अभिजित वंजारी यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या