प्रलंबित मागण्यांची अद्याप पुर्तता नाही ! राज्यातील तहसीलदार व नायब तहसीलदार वर्गांत उमटला नाराजीचा सुर ! संघटनेचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय समाेर काळ्याफिती लावून धरणे आंदोलन !
चंद्रपूर - गेल्या अनेक वर्षांपासून शासनस्तरांवर तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या रास्त मागण्या प्रलंबित असून शासनाने त्यांच्या मागण्यांची अद्याप दखल घेतली नसल्याचे एकंदरीत दिसुन येते .याच मागण्यांच्या पुर्ततेसाठी उपरोक्त तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने राज्यभर दि.३०मार्चपासून टप्प्या टप्प्याने आंदाेलनाची सुरुवात करण्यांत आली असून याच आंदाेलनाचा एक भाग म्हणून आज शुक्रवार दि. १ एप्रिलला चंद्रपूर जिल्ह्याधिकारी कार्यालया समाेर तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी काळ्याफिती लावून निदर्शने केली. दरम्यान संघटनेच्या प्रलंबित मागण्यांची पुर्तता झाली नाही तर येत्या ४ एप्रिल पासून काम आंदोलन करण्याचा इशारा याच संघटनेनी दिला आहे .दरम्यान आजच्या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गाैंड , राजूराचे तहसीलदार हरीष गाडे , बल्हारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार , गाेंडपिपरीचे तहसीलदार के .डी.मेश्राम , भद्रावतीचे तहसीलदार अनिकेत साेनवाने , सहा जिल्हा पुरवठा अधिकारी मॅचेवार, श्री गांगुर्डे, श्री नायब तहसीलदार राजू धांडे , डाँ .जितेन्द्र गादेवार , व नायब तहसीलदार डाँ .सचिन खंडाळे, गीता उत्तरवार, यांनी आपला सहभाग नाेंदविला. राज्यभरात आज तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे आंदोलन झाले असल्याचे व्रूत्त नुकतेच प्राप्त झाले आहे . या संघटनेच्या एका शिष्टमंडळाने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेत त्यांना मागण्यांचे एक निवेदन सादर केले या वेळी जिल्ह्यातील तहसीलदार व नायब तहसीलदार उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068



टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या