धक्कादायक ! भद्रावतीच्या ढोरवासा-पिपरी मार्गालगत २२ वर्षीय युवतीचा शिरछेद असलेला व विवस्त्र असलेला मृतदेह सापडला : पोलीस विभागाकडे आवाहन

Vidyanshnewslive
By -
0

धक्कादायक ! भद्रावतीच्या ढोरवासा-पिपरी मार्गालगत २२ वर्षीय युवतीचा शिरछेद असलेला व विवस्त्र असलेला मृतदेह सापडला : पोलीस विभागाकडे आवाहन 

भद्रावती :- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील ढोरवासा- पिपरी मार्गालगत सरकारी आयटीआय समोरील शेत शिवारात अंदाजे २२ वर्षीय एका अनोळखी युवतीचा शिरच्छेद केलेला नग्नावस्थेतील मृतदेह आढळून आला. आज (सोमवार) सकाळी अकराच्या सुमारास एका अनोळखी मुलीचा मृतदेह असल्याची माहिती भद्रावती पोलिसांना मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेहाची ओळख पटलेली नाही. शीर शोधून काढण्यासाठी चंद्रपूर पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल झाली आहे. याबाबत माहिती अशी, युवतीचा मृतदेह बेवारस फेकून दिला असल्याचा निनावी फोन आज सकाळी अकराच्या सुमारास भद्रावती पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांचा ताफा सरकारी आयटीआय लगतच्या शेतशिवारात दाखल झाला. त्या ठिकाणी पोलिसांना शिरच्छेद करून मृतदेह बेवारस फेकून दिल्याचे दिसून आले. मृतदेह नग्नावस्थेत आणि मुंडके नसलेल्या अवस्थेत होता. दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून तपासाच्या सुचना दिल्या. परिसरातील शेतशिवारात शीर शोधण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. मृतदेह नग्नावस्थेत आढळून आल्याने सदर युवतीसोबत अत्याचार करून क्रुरपणे हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भद्रावती येथे पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)