लग्नसोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी नेलगुंडा येथे आलेल्या ४ नक्षल्याना सि-६० पथकाच्या जवानांनी केली अटक
गडचिरोली :- छत्तीसगड राज्याच्या सिमेला लागून असलेल्या भामरागड तालुक्यातील नेलगुंडा येथे चार नक्षल्यांना सि-६० पथकाच्या जवानांनी अटक केल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून प्राप्त झाली आहे. हे चारही नक्षली एका लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी आले होते, अशी माहीती प्राप्त झाली आहे. नक्षल्यांनी २५ एप्रिलपासून मृत नक्षली नर्मदाक्का हिच्या स्मृतीप्रित्यर्थ बंदचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून नक्षलविरोधी कारवाई तीव्र करण्यात आली आहे. अशातच सि-६० पथकास मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे नेलगुंडा येथून चार नक्षल्यांना अटक करण्यात आलेली आहे. या घटनेबाबत पोलीस विभागाकडून अद्याप अधिकृत वृत्त देण्यात आलेले नाही. परंतु अटक करण्यात आलेल्या नक्षल्यांना हेलिकॉप्टरद्वारे गडचिरोली येथे पोलीस मुख्यालयात आणण्यात आल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली आहे. याबाबत अधिकृत वृत्त लवकरच प्रकाशित केली जाईल अशी माहिती प्राप्त होत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या